child death esakal
जळगाव

Jalgaon News: शवविच्छेदन न करताच मृतदेह घेऊन गेले कुटुंबीय; दुसऱ्या दिवशीही पोलिस अनभिज्ञच

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News: शहरातील उस्मानिया पार्कमध्ये चुलतभावाच्या लग्नासाठी आलेल्या सातवर्षीय तस्मिरा परवेझ सय्यद या बालिकेचा सेप्टीटँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ९) घडली. (family members took dead body without postmortem jalgaon news)

चिमुकलीला जिल्हा रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र, शवविच्छेदन न करताच कुटुंबीयांनी परस्पर मृतदेह गावी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या दिवशीही शहर पोलिसांना घटनेबाबत विस्तृत माहिती नव्हती.

जिल्‍हा रुग्णालयात नातेवाइकांनी बालिकेस आणले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून बालिकेस मृत घोषित केले. त्या वेळी निर्णय घेण्यासाठी बालिकेचे आई-वडील व जवळचे कुणीच नसल्याने मृत बालिकेला घेऊन नातेवाईक परत निघाले. सायंकाळी खासगी गाडीने ते मूळ गावी निजामपूरला गेले.

बालिकेचा सेप्टीटँकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना पोलिसांना फोनवरून कळविण्यात आली होती. जिल्‍हा रुग्णालयाने एमएलसी कळविणे बंधनकारक असतानाही नातेवाईक मृत बालिकेला घेऊन गेले. अशिक्षित नातेवाईक, अनभिज्ञ पोलिस आणि निष्काळजी प्रशासकीय यंत्रणेमुळे मृत बालिकेची साधी नोंदही झाली नाही.

बांधकाम कायदेशीरच

येथे बालिकेचा बुडून मृत्यू झाला. त्या जागेचा कायदेशीररीत्या खरेदी करून ताबा घेतला आहे. सर्व दस्तऐवज पूर्ण असल्यावरच परवानगी घेऊन बांधकाम सुरू झाले. बालिका मृत्यूचे आम्हालाही दुःख आहे. रोज त्या टाक्या झाकून ठेवतो. मात्र, पाण्यासाठी कुणीतरी झाकण उघडले असेल, असे बांधकाम विकसक गुड्डूभाई सालार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT