Death News esakal
जळगाव

Jalgaon : पोटावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ट्रॅक्टरचे चाक पोटावरुन गेल्याने विजय भिका चौधरी (४३, रा. सावखेडा, ता. जळगाव) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.२) दुपारच्या सुमारास घडली. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सावखेडा (ता.जळगाव) येथे विजय चौधरी हे शेतकरी कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. मंगळवारी (ता.१) ट्रॅक्टर दुरुस्ती करीत असताना त्यांच्या पोटावरुन ट्रॅक्टरचे चाक गेले. यात चौधरी यांना गंभीर दुखापत झाली.(Farmer dies after tractor runs over his stomach Jalgaon News)

त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु असताना आज त्यांचा मृत्यू झाला. विजय चौधरी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला.

दुपारी त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल फेगडे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT