Death News
Death News esakal
जळगाव

Jalgaon News : लग्नपत्रिका वाटताना वरपित्याचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अवघ्या १० दिवसांवर मुलाचा विवाह येऊन ठेपल्याने वरपित्याची लग्नपत्रिका वाटण्याची घाई सुरू होती. (Father death during giving son marriage invitation jalgaon news)

ऑफिसच्या सहकाऱ्यांसह जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पत्रिका वाटण्यास निघाले असताना, दुपारी एरंडोल येथील कार्यालयात अचानक हृदयविकाराचा झटका आला अन्‌ वरपित्याचा मृत्यू ओढवला. ग. स. सोसायटीतील प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे असे मृत पित्याचे नाव आहे.

जळगाव शहरातील जीवननगरातील रहिवासी तथा ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र मोरे (वय ५७) यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे १ जूनला लग्न आहे. यानिमित्त ते मंगळवारी (ता. २३) सकाळी लग्नपत्रिका वाटप करण्यासाठी बाहेर पडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोपडा, अमळनेर, धरणगावमार्गे ते एरंडोल येथील ग. स. सोसायटीच्या कार्यालयात दुपारी तीनच्या सुमारास आले. तेथे खुर्चीवर बसले असताना, अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्याच रुग्णालयात नेले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जळगावला नेण्यास सांगितले. जळगाव शासकीय रुग्णालयात आणले असता, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT