Ventilator Sakal
जळगाव

जळगाव : व्हेंटिलेटरविषयी बदनामी याचिकेवर १ ला फेब्रुवारीला सुनावणी

माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळेंसह तिघांवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासह प्राणरक्षक व्हेंटिलेटरबाबत (ventilator)खोटी माहिती पसरवित शासनाची बदनामी (defamation)केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. यामध्ये माहिती अधिकार (Right to Information) कार्यकर्ते दिनेश भोळेंसह तिघांनी शासनाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप आहे. याबाबत पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.

काही महिन्यांपासून जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे, शिवराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयविषयी विविध खोटे आरोप करून जनमानसात जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हेंटिलेटर खरेदी घोटाळा, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बोगस, मॅमोग्राफी मशीन धूळखात अशा प्रमुख मुद्द्यांवर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केले होते. यात कुठलीही सत्यता नसल्याने हे सर्व आरोप जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी खोडून काढले आहे.

याप्रकरणी डॉ.चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचीकावर मुख्य न्यायदंडाधिकारी मुगळीकर यांच्या न्यायालयात याबाबत कामकाज चालले. याचिका दाखल करून घेत डॉ. चव्हाण यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले आहे. दिनेश भोळे, शिवराम पाटील, गजानन मालपुरे या तिघांवर प्रत्येकी एक कोटी रुपये अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेत व्हेंटिलेटर परत गेल्याने आता व्हेंटिलेटरची चणचण भासत आहे. तिघांनीही गेल्या काही महिन्यांपासून जे चुकीचे आरोप केले आहे, ते त्यांना आता न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांच्या वतीने ऍड. हरिहर पाटील यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT