traditional farming esakal
जळगाव

शाश्वत विकासाकरिता पारंपरिक शेती करा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शेतीच्या शाश्वत विकासाकरिता पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या गोष्टींचा अवलंब करावा. पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज शिरसोली येथे केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र (ममुराबाद) यांच्यातर्फे शिरसोली प्र. बो. ग्रामपंचायत कार्यालयात आज कृषी संजीवनी मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी राऊत यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते. कृषी संजीवनी मोहीम प्रारंभापूर्वी शिरसोली प्र. बो., शिरसोली प्र.न.या गावात भजनी मंडळ, जिल्हा परिषद शाळा व पद्मालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावात कृषी संजीवनी मोहीम व निंबोळी अर्क तयार करण्याबाबत जनजागृत प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, की शहरालगत व जवळच्या गावातील शेतकरी, शेतकरी गट, युवा शेतकरी, महिला बचतगट यांनी प्रक्रिया उद्योगची कास धरून नव्याने उद्योग सुरू करून शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन शाश्वत उत्पन्नाकडे वाटचाल करावी. या वेळी विविध पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, नाबार्डचे व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती, वैभव सूर्यवंशी, शिरसोली प्र.बो. सरपंच प्रदीप पाटील, शिरसोली प्रन सरपंच हिलाल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, आत्मा तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी सूत्रसंचालन केले. तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

BEST Recruitment: बेस्टमध्ये भरतीचा 'फेक मेसेज', मुख्यालयात बेरोजगारांच्या रांगा; प्रशासनाची तारांबळ

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

IND A vs AFG A: भारतीय संघ तीनशे पार... वैभव सूर्यवंशीच्या अपयशानंतरही इतरांनी अफगाणिस्तानला झोडले

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

SCROLL FOR NEXT