gulabrao patil sakal
जळगाव

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

पालकमंत्री पाटील : वडनगरीत विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विकासासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे निधी, अर्थात गल्ला असून यात कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही, असे आश्‍वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी (ता. २४) वडनगरी येथे दिले. तालुक्यातील वडनगरी येथे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जनाआप्पा कोळी, बाजार समिती सभापती कैलास चौधरी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की परिसरासाठी आज स्मशानभूमी पोहच रस्ता तयार झाला असून याच्या जोडीला गावातील विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने गावाजवळचा पुल, रस्त्यासह स्मशानभूमी सुशोभीकरण, व्यायाम शाळेचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत. प्रास्ताविक वडनगरीचे सरपंच उमाकांत पाटील यांनी केले. तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आभार ग्रामसेवक सतीश पाटील यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

Latest Marathi News Live Update : पुण्यात चक्क "पोर्टर" डिलिव्हरी ॲपवरून ड्रग्स विक्री

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT