Eknath Khadse-Girish Mahajan Sakal
जळगाव

Eknath Khadse : खडसेंचे कारनामे लवकरच बाहेर येणार - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांचे कारनामे लवकरच बाहेर येतील, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.

जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला आहे, असे अनेक कारनामे लवकरच बाहेर येतील. त्यांनी कायद्याचा एवढा खोटा आधार घेतला आहे. आता आमची वेळ आली आहे. त्यांनी कायद्याला सामोरे जावे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी पाच वर्षांत तेथे काय केले, काय नाय केले, हेही लवकरच जनतेसमोर येईल. आम्ही त्यांच्यासारखा एकही खोटा गुन्हा दाखल करणार नाही.

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीबाबतही श्री. महाजन यांनी श्री. खडसे यांना आव्हन दिले. श्री. खडसे आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेत आहेत. ते म्हणतील तो उमेदवार आपण त्यांच्याविरोधात देऊ. त्यांनी निवडून येऊन दाखवावे, असे खुले अवाहनही श्री. महाजन यांनी खडसे यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT