Child death esakal
जळगाव

Jalgaon News : कूलरचा शॉक लागल्याने चिमुरडीचा वाढदिवशी अंत!

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वाढदिवस असल्याने सायंकाळी सर्व कुटुंबीय बालिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करीत असताना शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुलरमध्ये वीजप्रवाह उतरल्याने शॉक लागून तिचा मृत्यू झाला. (girl died due to electric shock in cooler jalgaon news)

ही घटना मुक्ताईनगर येथील जिजाऊ नगरात घडली. वाढदिवशीच चिमुरडीचा अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी चेतन सनान्से (वय ९) हिचा शुक्रवारी नववा वाढदिवस होता. तिचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन होते. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. वाढदिवसाच्या केकसह सर्व तयारी झाली होती.

सायंकाळी वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. तत्पूर्वी वैष्णवी सायंकाळी कूलरजवळ असताना तिचा कूलरला हात लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, कूलरमध्ये वीजप्रवाह उतरल्याने क्षणार्धात जोरात झटका लागून तीन फेकली गेली.

तिला दवाखान्याचा नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वैष्णवी ही चेतन महाराज यांची कन्या तर ओम साई सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष सनान्से यांची पुतणी आहे.

गोपाळ सनान्से (चिचोंल, ह. मु. मुक्ताईनगर) यांची नात आहे. वैष्णवीवर शनिवारी (ता. २०) सकाळी नऊला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांनो तिकीट सांभाळा! मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला; विनातिकीट प्रवासाला आळा बसणार

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

Creta Car Accident : दुचाकीला धडकेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळली क्रेटा, सासू सुनेचा मृत्यू; १३ तासानी गाडी काढली बाहेर

Navi Mumbai News: भुयारी मार्गात अडथळा, मोरबे जलवाहिनी हलवणार; कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

SCROLL FOR NEXT