Gold and silver investment  Sakal
जळगाव

सोने, चांदी गुंतवणुकीतून मिळाला पाच कोटींपेक्षा अधिकचा परतावा

पंधरा दिवसांतील चित्र; अजूनही सोने, चांदी मोड देणे सुरूच

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सोने, चांदी बाजाराचे एक वैशिष्ट असते. सोने, चांदी ज्या दराने खरेदी कराल त्यांच्या कित्येक पट अधिकचा परतावा मिळतो. मात्र त्यासाठी काही काळ वाट पहावी लागते. ज्यांनी सोने ४० ते ४५ हजारांनी (प्रती तोळा) किंवा चांदी पन्नास हजारांनी खरेदी (प्रतीकिलो) केली त्यांना आज मोड दिल्यानंतर सोन्यात तेरा हजारांचा तर चांदीत एकवीस हजारांचा फायदा मिळाला आहे. सोने, चांदी मोडीतून गेल्या पंधरा दिवसात तब्बल पाच कोटीपेक्षा अधिक परतावा ग्राहकांनी घेतला आहे.

२४ फेब्रुवारीस रशिया-युक्रेन युध्द सुरू झाले. त्यानंतर लागलीच सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाली. सोने ५३-५४ हजारांपर्यंत पोचले. त्यात चढउतारही झाले आहेत. सोन्यातील वाढत्या दराचा गुंतवणूकदारांनी फायदा घेत सोने मोडीत काढले. तशी चांदीही मोडीत काढली. जुन्या दरातील व आजच्या दरातील तफावतीमुळे त्यांना नफा झाला. ग्राहकांना सोने, चांदी विकत घेताना जून दर कमी होते व विकताना ते जादा होते. अनेक ग्राहकांनी सोने, चांदीत मोडीत काढून सुमारे पाच कोटींपेक्षा अधिकचा परतावा घेतला असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिक व्यक्त करतात. सर्वच दुकानामध्ये मोड देण्यासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसते. काही जण अजून सोने, चांदीच्या दरात वाढ होईल याची वाट पाहताहेत. मात्र काहींनी सोने, चांदीतील तेजीचा फायदा घेत मोडही दिल्याचे चित्र सर्वच सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांकडे पाहावयास मिळत आहे. जुने सोने आपण मोडायला जातो तेव्हा घट लागते असे सांगितले जाते. मात्र ते तसे नसते. त्याची शुद्धता किती हे तपासले जाते. तर आजच्या दरात तीन टक्के कपात होते.

चांदीत दोन हजारांची घसरण

गेल्या तीन दिवसाचे चित्र पाहता सोन्याच्या दरात तब्बल आठशे रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण झाली आहे.

सोने, चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. ५४ हजारांवर गेलेले सोने आज ५२ हजार ४०० वर आले आहे. मोड देण्याच्या प्रमाणात काहीशी वाढ झालेली आहे. लग्न सराईनिमित्त सोन्याला अधिक मागणी वाढली आहे.

- मनोहर पाटील, व्यवस्थापक,रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

सोने, चांदीचे ‘जीएसटी’विना दर असे

तारीख सोने (प्रतितोळे) चांदी प्रतिकिलो

५ मार्च ५२ हजार ५०० ७० हजार

७ मार्च ५३ हजार ७१ हजार

८ मार्च ५३ हजार ७१ हजार

९ मार्च ५३ हजार ७२ हजार

१० मार्च ५३ हजार ७१ हजार

११ मार्च ५२ हजार २०० ७० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT