administration work during Corona is remarkable Gulabrao Patil sakal
जळगाव

'हेमा मालिनीचे गाल सोडले...आता ओम पुरींचे गाल पकडले'- गुलाबराव पाटील

सकाळ डिजिटल टीम

सध्या प्रचार सभांनी जोर धरला असून एकमेकांवर टीका-टिप्पण्या केल्या जात आहेत. एकनाथ खडसेंवर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली होती. रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. यानंतर त्यांनी आणखी एक वक्तव्य करून सभेत हशा पिकवला. पण त्यामुळे पाटील यांनी आणखी एक काँट्रोव्हर्सी ओढावून घेतल्याचं दिसतंय.

शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांची सभांमध्ये होणारी भाषणं कायम चर्चेचा विषय ठरतात.

यंदाही बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी रस्त्यांवर पुन्हा भाष्य केलं. धरणगावातील रस्ते हे हेमामालिनीच्या गालासारखे आहेत. तुम्हाला धड बोदवडचा रस्ता करता आला नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी टोला लगावल्याने स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना हेमामालिनींच्या गालांऐवजी ओमपुरींच्या गालांशी केली. त्यामुळे आता नव्या कॉन्ट्रोव्हर्सीला जन्म दिला आहे.

'आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडलाय'

पालकमंत्र्यांनी बोदवडमध्ये विकासकामाचं उद्धघाटन केलं. यावेळी भाषणादरम्यान, 'माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमामालिनींच्या गालासारखे गुळगुळीत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्याची आठवण त्यांनी पुन्हा करून दिली.

'खराब रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगताना मी जे बोलून गेलो, त्यातून कोणाचंही मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मागच्या भाषणात माझ्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. मीडियाने माझं ते वक्तव्य प्रचंड चालवलं. त्यामुळं आता तो गाल सोडला आणि ओम पुरीचा गाल पकडलाय. यावरून तरी कोणी टीका करू नका, असं मंत्री महोदयांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT