An offering of fruits at the ascetic Hanuman temple in Shahunagar.  esakal
जळगाव

Hanuman Jayanti 2023 : एकमुखाने बोला.. बोला जय जय हनुमान..! दर्शन पूजन, भंडाऱ्याने जन्मोत्सव साजरा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शक्ती आणि बुद्धीचे प्रतीक, समस्त भारतवासीयांचे दैवत असलेल्या हनुमानाचा जन्मोत्सव गुरुवारी (ता. ६) भक्तांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पहाटेपासून मारुती मंदिरांवर अभिषेक, पूजन आदी कार्यक्रम झाले. भक्तांच्या रांगा आणि भंडाऱ्यांनी हा उत्सव साजरा झाला. (hanuman jayanti 2023 celebrated with great enthusiasm jalgaon news)

हनुमान जयंतीनिमित्त बुधवार (ता. ५)पासूनच मंदिरे सजली होती. जळगाव शहरात जिल्हा परिषदेसमोरील पत्र्या हनुमान, गोलाणी संकुलाजवळील दक्षिणमुखी मारुती, सिंधी कॉलनी मार्गावरील पंचमुखी हनुमान, मेहरूणमधील मारुती मंदिर यांसह विविध भागांतील मंदिरांमध्ये गुरुवारी दिवसभर हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी सहापासून धार्मिक विधी व नंतर जन्मोत्सव झाला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

महाप्रसादाच्या पंगती

सकाळपासून भक्तांनी हनुमंताच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मारुतीला रुईचा हार, शेंदूर, तेल चढविण्यात आले. मंदिरांमध्ये नारळही वाढविण्यात आले. सकाळी अकरापासून विविध ठिकाणच्या मंदिरांसमोर सभा मंडपात, मोकळ्या जागेत महाप्रसादाच्या पंगती सुरू झाल्या. हजारो भक्तांनी दर्शन, महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर विविध भजनेही झाली. ‘अंजनीच्या सूता तुला रामाचे वरदान... एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान...’, अशा भक्तिगीतांनी मंदिर परिसरातील वातवरण चैतन्यपूर्ण बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT