निधी खर्च होणार नसेल, तर समर्पित करा sakal
जळगाव

निधी खर्च होणार नसेल, तर समर्पित करा

पालकमंत्री पाटील : जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा आरोग्य यंत्रणांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना मोठ्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी विहित कालावधीत खर्च होणे अपेक्षित आहे. निधी खर्च होणार नसेल तर समर्पित करावा, जेणेकरून इतर यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. २९) दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात झाली. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, की जिल्हा वार्षिक योजनेच्या यावर्षीच्या पुनर्वियोजनात स्मशानभूमी, शाळाखोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकामासाठी पाच कोटी रुपयांची, जिल्ह्यात वारकरी भवन बांधण्यासाठी एक कोटी, लोककला भवनासाठी एक कोटी, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी ११ कोटी, जिल्ह्यातील भूमिअभिलेख कार्यालयास यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी एक कोटी ९० लाख, मातोश्री शेत रस्त्यांसाठी १५ कोटी, शिवाय महिला बचतगटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उभारण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन ठिकाणी महिला बचतगट भवन उभारण्यास सात कोटी रुपयांची तरतूद करण्याचा विचार आहे.

पालकमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंगणवाडीसाठी स्वतःची इमारत, प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी, यासाठीचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तातडीने सादर करावे. जिल्ह्याला वित्त विभागाकडून मिळणारा ‘आव्हान’ निधी मिळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियमांचे पालन करून विहित कालावधीत विकासकामांचे नियोजन करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून आतापर्यंत झालेल्या, तसेच खासदार/आमदार निधीतील कामांचा व खर्चाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेसह इतर विभागांकडील स्पील, नवीन कामांचे नियोजन व पुढील वर्षाचा प्रारूप आराखडा याचाही आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रयोगशाळा उभारणार

पालकमंत्री पाटील म्हणाले, की ज्या गावांमध्ये अंगणवाड्या ओट्यांवर, सेविकांच्या घरी, समाजमंदिरात भरतात त्या गावांमध्ये अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारणे, ज्या शाळांमध्ये वीजजोडणी नाही त्या शाळांमध्ये वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT