Arrested News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अट्टल गुन्हेगार जळगावातुन अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील छत्रपती शिवाजीनगरातील ख्रिश्चन स्मशानभूमीजवळ रस्ता अडवून मारहाण करून मोबाईल व रोकड लांबविणाऱ्या दोघांपैकी एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संशयिताकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे.

छत्रपती शिवाजीनगरमधील ख्रिश्चन स्मशानभूमीजवळ दोघांनी एका तरुणाला मारहाण करून मोबाईल व रोकड लांबवल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.(Inveterate criminal Arrested from Jalgaon Jalgaon Crime News)

या गुन्ह्यातील संशयित जळगाव टोलनाका परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यावरून हवालदार विजयसिंह पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदीप साळवे, विजय पाटील, प्रीतमकुमार पाटील, किरण धनगर, ईश्वर पाटील यांनी मंगळवारी (ता. २०) दुपारी दोनला संशयित युसूफ ऊर्फ चिल्या (रा. शिवाजीनगर) याला ताब्यात घेतले.

त्याने हिसकावून नेलेला मोबाईल जप्त केला असून, गुन्ह्यातील रोकड खर्च केल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT