Tax Recovery
Tax Recovery esakal
जळगाव

Jalgaon Tax Recovery : जळगाव जिल्ह्यात 164 कोटी महसूल वसुली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्याला प्रत्येक वर्षी महसूली वसुलीचे उद्दिष्ट दिले जाते. ते यावर्षीही १४५ कोटी रुपये दिले होते. यावर्षी त्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे म्हणजे १६४ कोटी ४७ लाख एवढी महसूल वसूल केले. गेल्या वर्षी १२८ कोटी ८२ लाख उद्दिष्ट होते. त्यात ११७ कोटी बारा लाख वसूल झाले होते. म्हणजे यावर्षी तब्बल ५३ कोटी पेक्षा अधिकची वसुली झाली. उद्दिष्टांपेक्षा २१ कोटी रुपयाची अधिकची वसुली केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेचे अभिनंदन केले. (Jalgaon 164 crore revenue recovery in district)

महसूल विभागाकडे जिल्ह्यातील सर्व प्रकारची काम सांभाळून वेगवेगळ्या प्रकारच्या महसूली वसुलीचे काम असते त्यात गौण खनिज, जमीन महसूल, नजराण्याचे प्रकरण इत्यादी प्रकार येतात. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यात घातलेलं लक्ष,महसूल यंत्रणेतील तलाठ्या पासून ते मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार.

तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी ( महसूल ), अपर जिल्हाधिकारी यांनी केलेले विशेष प्रयत्न त्यामुळे आज र्यंत झाली नव्हती एवढी वसुली झाली आहे. ही महसूली वसुली नाशिक महसूल विभागातील सर्वाधिक वसुली असल्याचेही महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जळगाव जिल्ह्याची भरारी

अनेक विभागात अव्वल कामगिरी केलेल्या जळगाव जिल्ह्यात आयएसओ’ मानांकन मिळविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांची राज्यात सर्वाधिक आहे. यातून गुणवत्तापूर्ण अधिक पारदर्शी काम दिसते. महसूल अभिलेख त्रुटी रहित ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी करून द्यावयाचे घोषणापत्र क्रमांक ४ जिल्ह्यातील सर्व महसुली गावांचे पूर्ण झाले असून. (latest marathi news)

असे करणारा जळगाव राज्यातील एकमेव जिल्हा आहे. ई चावडी प्रकल्पाची अंमलबजावणी १०० % जळगाव जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय कामाला गती आली आहे. ‘रोहयो’ योजनेची अंमलबजावणी मध्ये जळगाव जिल्ह्याने १०० टक्के कार्यवाही पूर्ण केली आहे.

तालुकानिहाय वसुली अशी

तालुका--एकूण--टक्केवारी

जळगाव-- २७ कोटी ७७ लाख १२ हजार-- १०८.४८

जामनेर-- १३ कोटी १७ लाख ९७ हजार -- १२५.५२

एरंडोल-- ११ कोटी ५५ लाख ९१ हजार -- ११८.५५

धरणगाव- ९ कोटी ५८ लाख ४२ हजार- १०६.४९

पारोळा- ५कोटी २५ लाख ५ हजार -- ११६.६८

भुसावळ-- १४ कोटी ९ लाख ७२ हजार- ११४.१५

बोदवड-- ४ कोटी ९३ लाख ८७ हजार -- १२०.४६

मुक्ताईनगर-- १३ कोटी ५८ लाख ४ हजार-- १२०.४६

रावेर- ८ कोटी ५६ लाख ९०हजार-- २२०.८२

यावल- ७ कोटी ८ लाख २० हजार- ८७.४३

अमळनेर- १० कोटी १६ लाख ९६ हजार-- ८७.४३

चोपडा-- ६ कोटी ४८ लाख ९४ हजार-- ८१.२२

पाचोरा-- १० कोटी ६० लाख २८ हजार -- १११.६१

भडगाव-- ६ कोटी ६२ लाख-- १२९.८१

चाळीसगाव-- १३ कोटी ४२ लाख-- ८३.९१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT