Garbage piled up in Golani's elevator. Golani market cleaned in second photo. esakal
जळगाव

Jalgaon News : ...अबब ‘गोलाणी’तून काढला 17 टन कचरा! महापालिकेच्या आरोग्य विभागाची कामगिरी

Jalgaon News : नागरिकांच्या तक्रारीवरून गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (ता. ७) राबविण्यात आली. त्यात तब्बल १७ टन कचरा गोळा करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील गोलाणीमार्केट मध्ये साफसफाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. अनेक महिन्यांपासून घाण साचली होती. याबाबत गोलाणीतील व्यावसायिक, नागरिकांच्या तक्रारीवरून गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (ता. ७) राबविण्यात आली. त्यात तब्बल १७ टन कचरा गोळा करण्यात आला. (17 tons of waste removed from Golani)

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोलाणी मार्केटमध्ये रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ११० कर्मचाऱ्यांनी गोलाणी मार्केटमधील पहिला व दुसरा मजला, तसेच मार्केटच्या चारही बाजूला साचलेला कचरा गोळा केला.

आरोग्य निरीक्षक या अभियानात रमेश कांबळे, नागेश लोखंडे, यु. आर. इंगळे, युनिटप्रमुख अजय चांगरे, सुरेश भालेराव, कुणाल बारसे, विशान वानखेडे, मुकादम शरद पाटील, एकनाथ दांडके, वालिदास सोनवणे, सिद्धर्थ चांगरे, शंकर अंभोरे, राहुल पवार, भरत सपकाळे, भीमराव सपकाळे, रवी सनकत, जगन्नाथ पाटील, विशाल चांगरे व कर्मचारी सहभागी झाले होते. (latest marathi news)

लिफ्टही केली स्वच्छ

गोलाणी मार्केटमधील पहिल्या व दुसऱ्या मजला, तळमजला व परिसर व बंद लिफ्टमधे साचलेला कचरा गोळा केला. यात ३ पीकअप, ३ घंटागाड्यांच्या दोन फेऱ्यांमधून कचरा गोळा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह

SCROLL FOR NEXT