Crime  sakal
जळगाव

Jalgaon Crime : बंद घरे ठरताहेत चोरट्यांचे लक्ष्य; रामानंदनगरातून 20 तोळे सोने, मेहरुणमधून 65 हजारांचा ऐवज लंपास

Jalgaon Crime : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. चोरटे बंद घरे लक्ष्य करीत असून, दिवसाढवळ्या ऐवज लंपास करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. चोरटे बंद घरे लक्ष्य करीत असून, दिवसाढवळ्या ऐवज लंपास करीत आहेत. बसस्थानकात बसमध्ये चढताना आठवडाभरात तिघांचे पावणेतीन लाख रुपये लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. देवीचे पाठ वाचण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना रविवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास रामानंदनगर परिसरात भरदिवसा घडली. (20 tola gold from Ramanandnagar and 65 thousand instead of gold from Mehrun )

शहरातील रामानंदनगर परिसरात कमल मेडिकलच्या शेजारी गल्लीत वनिता जगन्नाथ चौधरी या वृद्ध महिला एकट्याच वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारच्या गल्लीत राहणाऱ्यांकडे दुर्गा सप्तशती पाठ पठनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे वनिता चौधरी या वृद्ध महिला त्या ठिकाणी पाठ वाचण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी त्यांनी घराच्या मुख्य दरवाजासह संरक्षकभिंतीच्या लोखंडी गेटला कुलूप लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मागच्या बेडरुमधील तीन लोखंडी कपाट तोडून चोरट्याने त्यामध्ये ठेवलेले सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रक्कम चोरून नेली.

शेजारी राहणाऱ्या महिलेला घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी चौधरी यांना सांगितले. त्यानंतर चौधरी यांनी घराकडे धाव घेतली. कोणीतरी आल्याची चाहूल लागताच चोरट्याने चौधरी यांच्या घराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दरवाजाने शेजारी आपर्टमेंटच्या पार्किंगमध्ये उडी घेतली. त्यानंतर ऐवज घेऊन चोरटा तेथून मागच्या बाजूने पसार झाला. भरदिवसा चोरट्याने वनिता चौधरी यांच्या घरातील तीन कपाटे तोडून त्यामध्ये ठेवलेला ऐवज लंपास केला. या परिसरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे चोरट्याने मागच्या बाजूने पोबारा केला.

..घटनांचा मागोवा

दरम्यान, गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यात २६ सप्टेंबरला मुंबई येथे मुलीकडे गेलेल्या उषा ईश्वर सोनवणे यांचे खुबचंद साहित्यानगर, आव्हाणे (ता. जळगाव) येतील बंद घर फोडून चोरट्यांनी ७४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेहोते. तसेच मोहननगरात उपचारासाठी मुंबईत गेलेल्यांचे घर फोडून मोबाईलसह चांदीचे दागिने, रोकडसह लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. तसेच बसस्थानक परिसरात देखील चोरीचे प्रमाण वाढले असून, आठवडाभरात तीन जणांचे पावणेतील लाख रुपये लंपास झाले.

दुकानातून २५ गोणी तांदूळ, शंभर लिटर तेलासह रोकड लंपास

शहरातील शेरा चौकातील सुहान शॉप हे दुकान फोडून दुकानातून किरणा सामानासह रोकड असा एकूण ६५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मेहरुण येथील शेराचौक परिसरात इब्राहिम अब्दुल सत्तार कच्छी (वय ५१) परिवारासह वास्तव्याला आहे.

त्यांचे घरासमोरच सुहाना सुपर शॉप दुकान आहे, दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (ता. ४) रात्री दहाला नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले होत. मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातून ५ हजारांच्या रोकडसह २५ गोणी तांदूळ (७५० किलो , तेलाचे दहा बॉक्स (१०० लिटर) असे एकूण ६५ हजारांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (ता. ५) सकाळी साडेआठला उघडकीला आला. त्यानंतर कच्छी इब्राहिम यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस नाईक रामकृष्ण पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Petrol-Diesel-CNG Price: 23 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

Tawade Hotel Area Action : तावडे हॉटेल परिसरात 23 बांधकामे तोडली; महापालिकेची धडक कारवाई, अतिक्रमित झालेली 2900 चौरस मीटर जागा खुली

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

SCROLL FOR NEXT