Nobel Foundation
Nobel Foundation esakal
जळगाव

Jalgaon News : राज्यातील 50 शालेय विद्यार्थ्यांना निःशुल्क इस्रोला जाण्याची संधी; नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : विद्यार्थी व पालकांसाठी सुखद बातमी आहे. राज्यातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला जाण्याची संधी जळगावच्या नोबेल फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. २०२४ साठी होणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून, सदर परीक्षा ९ जून २०२४ ला ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विज्ञान व संशोधन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी नोबेल फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. (Jalgaon 50 school students from state get chance to go to ISRO for free marathi news )

ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्चशिक्षण संस्था अनुभवता याव्यात, तसेच विज्ञान व गणित या विषयाचा पाया पक्का व्हावा यासाठी नोबेल फाउंडेशनतर्फे ‘नोबेल सायन्स टॅलेंट सर्च’ परीक्षेचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. इंग्रजी व मराठी माध्यमाच्या सर्व बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा ९ जून २०२४ ला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी www.nobelfoundation.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. मागील वर्षी या परीक्षेद्वारे ६१ विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी सहलीसाठी निवड झालेली आहे. आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी इस्रो, आयआयटी भेटीचा लाभ घेतला आहे. या परीक्षेत गुणवत्तायादीमध्ये येणाऱ्या प्रथम पन्नास विद्यार्थ्यांना निःशुल्क इस्रो, आयआयटी आयआयएम, सायन्स सिटी येथे अभ्यास सहलीला नेण्यात येणार आहे.

गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी निवडण्यात येईल. या विद्यार्थ्यांना करिअरच्या संदर्भात उन्हाळी व हिवाळी शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच अवकाश विषयक पुस्तके भेट दिली जाणार आहेत. सदर परीक्षेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी, बारावी डिप्लोमा असे तीन गट करण्यात आले आहेत, तिन्ही गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असून, परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे.

या उपक्रमासाठी भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन फाउंडेशन, निर्मल सीड्स, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल यांचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी नोबेल फाउंडेशन प्रगती शाळेसमोर जळगाव ७२१८५ ०१४४४, ९९२२० ०४१९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

''महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत. या विद्यार्थ्यांना शालेय वयापासून जर संशोधनाची गोडी लागली तर महाराष्ट्रातून नोबेलविजेते शास्त्रज्ञ घडतील, यासाठी सामुदायिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणून नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा आयोजित करीत आहोत. जेणेकरून गोरगरिबांच्या मजुरांच्या मुलांनासुद्धा इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था अभ्यासायला मिळतील.''- जयदीप पाटील, संस्थापक, नोबेल फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT