Jalgaon News : पाचोरा येथे रेशन दुकानदारांना अत्याधुनिक ई-पॉस मशिन वितरण

Jalgaon : येथील शहर व तालुक्यातील १४५ रेशन दुकानदारांना अत्याधुनिक ई-पॉस मशिनचे नुकतेच वितरित करण्यात आले.
Tehsildar Praveen Chavanke, Ranjit Patil, Abhijit Yewle etc. on the occasion of distribution of e-pos machine to ration shopkeepers.
Tehsildar Praveen Chavanke, Ranjit Patil, Abhijit Yewle etc. on the occasion of distribution of e-pos machine to ration shopkeepers.esakal

Jalgaon News : येथील शहर व तालुक्यातील १४५ रेशन दुकानदारांना अत्याधुनिक ई-पॉस मशिनचे नुकतेच वितरित करण्यात आले. या मशिनच्या सहाय्याने शिधापत्रिका धारकांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वाटपात पारदर्शकता येणार आहे. रेशन दुकानदार प्रथम शिधापत्रिकाधारकांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वाटप करीत असत. परंतु अनेकांचे अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने त्यांना रेशनपासून वंचित राहावे लागत होते. (jalgaon Distribution of state of art e POS machines to ration shopkeeper at Pachora marathi news)

अनेक अडचणी व तक्रारींचा सामना रेशन दुकानदारांना करावा लागत होता. अनेक आरोपही त्यांच्यावर केले जात असत. या सर्व बाबी विचारात घेता शासनाच्या वतीने शिधापत्रिका धारकांचे डोळे स्कॅन करून त्यांना धान्य वाटप करण्यासाठी हे अत्याधुनिक यंत्र आणले असून, त्याचे १४५ रेशन दुकानदारांना वाटप करण्यात आले. (latest marathi news)

Tehsildar Praveen Chavanke, Ranjit Patil, Abhijit Yewle etc. on the occasion of distribution of e-pos machine to ration shopkeepers.
Jalgaon News : अमळनेर रस्त्यावरील पथदीप बंद; वसाहतधारकांसह वाहनचालक त्रस्त, पालिका व महावितरणाचे दुर्लक्ष

कंपनीचे चेतन पाटील व राजू सूर्यवंशी यांनी या यंत्राचा वापर कसा करावा व धान्य वाटप कसे करावे या संदर्भात रेशन दुकानदारांना प्रशिक्षण दिले. तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या प्रसंगी नायब तहसीलदार रणजित पाटील, पुरवठा अधिकारी अभिजीत येवले, भावना सूर्यवंशी, पूनम खैरनार, सोमनाथ मिस्तरी, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे धान्य वाटपात पारदर्शकता येणार असून, कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Tehsildar Praveen Chavanke, Ranjit Patil, Abhijit Yewle etc. on the occasion of distribution of e-pos machine to ration shopkeepers.
Jalgaon News : उस कमी त्यात पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव; तालुक्यात ऊस शेतीची स्थिती, लागवडीकडे पाठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com