Fire Affected area esakal
जळगाव

Jalgaon Fire Accident: भुसावळात आगीत लाखांचे नुकसान; 8 ते 10 दुकानांचे साहित्य आगीत खाक

Fire Accident : काही क्षणातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोचून तब्बल दोन तास सुरू असलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : शहरातील डेली मार्केट मधील अडत दुकाने व फळ विक्रेते यांची आठ ते दहा दुकानांना (ता.२५) सकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याने अंदाजे साठ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आज सकाळी ही घटना घडली.

याबाबत फळ विक्रेते इक्बाल बागवान यांना डेली मार्केट मध्ये आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ नगरपालिका, अग्निशमन दल तसेच वीज मंडळाला कळविले. काही क्षणातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोचून तब्बल दोन तास सुरू असलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. (Jalgaon fire Accident Bhusawal marathi news)

यामध्ये भगवान चौधरी,नीलेश माळी, किरण महाजन,नरेंद्र चौधरी, युनूस बागवान, फारुख बागवान,इक्बाल बागवान, आसिफ बिस्मिल्ला,बबलू बाविस्कर, किरण भोई,आरिफ बागवान भाजीपाला अडत दुकानदार तसेच फळ विक्रेत्यांचे लाखांचे नुकसान झाले. नेमके आग लागण्याचे कारण समजू शकले नसून ही शॉट सर्किट मुळे लागली की, लावण्यात आली ही एक संशोधनाचा विषय आहे.

गेले तीन ते चार महिन्यापासून उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांच्या दालनात भाजीपाला अडत दुकानदार व फळ विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये या सर्व व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थलांतर करण्यात बाबत सूचना देण्यात आल्या होत्या व स्थलांतर न केल्यास शेवटची अल्टिमेटम दिला होता. मात्र यानंतर व्यापारी त्यांच्या मतावर ठाम होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT