Vipin Kharche_Jalgaon 
जळगाव

जळगावच्या जवानाचा काश्मीरमध्ये दरीत कोसळल्यानं मृत्यू; गावावर शोककळा

सुप्रिया सुळेंनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

मुक्ताईनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना मोटारसायकल दरीत कोसळून जळगाव जिल्ह्यातील जवान विपिन खर्चे यांचा मृत्यू झाला आहे. उद्या शासकीय इतमामात मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करुन याची माहिती दिली असून श्रद्धांजली वाहिली आहे. (Jalgaon jawan dies after falling into valley in Kashmir Mourning in the village)

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावचे सुपुत्र नायब सुभेदार विपिन खर्चे यांचा जम्मू-काश्मीर इथल्या उधमपूर येथे कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. त्यांची मोटारसायकल दरीत कोसळल्यानं त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी ही दुर्घटना घडली. आज रात्री उशीरा त्यांचं पार्थिव निमखेडीत पोहोचणार असून उद्या सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "जळगाव जिल्ह्यातील निमखेडी बु. ता. मुक्ताईनगर येथील जवान विपिन खर्चे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानास सलाम. खर्चे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT