Banana Crop esakal
जळगाव

Jalgaon Banana Crop : केळीच्या भावात 350 रुपयांची उसळी; केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेताच एकाच दिवसात केळी भावाने बऱ्हाणपूर येथील लिलावात क्विंटल मागे तब्बल ३५० रुपयांची उसळी घेतली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : केळीच्या घसरलेल्या भावाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेताच एकाच दिवसात केळी भावाने बऱ्हाणपूर येथील लिलावात क्विंटल मागे तब्बल ३५० रुपयांची उसळी घेतली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (Jalgaon Banana price high)

गेल्या २० दिवसांत केळीचे भाव क्विंटलमागे तब्बल १ हजार रुपये क्विंटलनी घसरले होते. भावातील ही घसरण व्यापाऱ्यांनी नियोजनबद्धरीत्या केल्याचे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानुसार रावेर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी हा प्रश्न जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे नेला.

दरम्यान, ‘सकाळ’ नेही घसरलेल्या भावाबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करून या अन्यायाला वाचा फोडली. आयुष प्रसाद यांनी तातडीने बऱ्हाणपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली. तसेच या लिलावाची प्रक्रिया सुरू असताना मंगळवारी (ता. ७) बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक अधिकारी ही तेथील बाजार समितीत उपस्थित होता.

याचा परिणाम म्हणून केळीच्या भावात वाढ झाली आहे. ५ मेस बऱ्हाणपूर बाजार समितीत ६० केळी गाड्या विक्रीसाठी आल्या होत्या, त्यातील १९ गाड्यांची विक्री होऊन केळीला सर्वाधिक ९५० रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. ६ मेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तिथे आल्याने लिलाव बंद होते. आज ७ मेस ही लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. ६४ केळी गाड्या विक्रीसाठी लिलावाच्या ठिकाणी आल्या होत्या. (latest marathi news)

त्यातील ३७ गाड्यांची विक्री होऊन केळीला सर्वाधिक १२९५ रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. व्यापाऱ्यांनी किती रुपयांना केळी खरेदी केली आणि किती रुपयांना विक्री केली याची माहिती मिळण्यासाठी आवश्यकता भासल्यास केळी व्यापाऱ्यांच्या दप्तराची ही तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.

उत्तर भारतात केळीला चांगले भाव मिळत असताना कृत्रिमरीत्या मंदी दाखविली जाते की काय? अशी शंका व्यक्त होत होती. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने केळीचे भाव पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली असल्याचे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बऱ्हाणपूर बाजार समितीतील जाहीर लिलावात केळीला जे किमान व कमाल भाव मिळतात त्यावर रावेर बाजाराचे केळी भाव अवलंबून असतात.

आता बऱ्हाणपूर बाजारात भाव समाधानकारक मिळाल्याने यामुळे बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, संचालक गणेश महाजन, जयेश कुयटे आदींनी समाधान व्यक्त केले आहे. आणखी एक, दोन दिवसांत केळी भाव योग्य दरावर स्थिर होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT