Scaffolds erected at various places from forest area to Raver forest area. esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अनुभवणार वन्यप्राण्यांचा थरार

Jalgaon : वन विभागातील चोपडा वनक्षेत्रापासून ते रावेर वनक्षेत्रामधील ठिकठिकाणी जंगल भागात प्राणी गणनेसाठी ४३ ठिकाणी मचाण तयार केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बुद्ध पौर्णिमेनिमित्त यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वन विभागातील चोपडा वनक्षेत्रापासून ते रावेर वनक्षेत्रामधील ठिकठिकाणी जंगल भागात प्राणी गणनेसाठी ४३ ठिकाणी मचाण तयार केले आहेत. गुरुवारी (ता. २३) बुद्धपौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ( Collector and Superintendent of Police will experience thrill of wild animals )

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, रेल्वेचे डीआरएम इति पांडे या मोहिमेत सहभागी होणार आहेत. चोपडा वनक्षेत्रात ३ मचाण, वैजापूर वनक्षेत्रात ७, अडावद वनक्षेत्रात ४, देवझिरी वनक्षेत्रात ४, यावल पूर्व वनक्षेत्रात ७ मचाण, यावल पश्चिम वनक्षेत्रात ६ मचाण, तर रावेर वनक्षेत्रात १२ मचाण, असे एकूण ४३ मचाण यावल वन विभागाने तयार केले आहेत. एका मचाणवर ५ ते ६ व्यक्ती एका वेळेस बसू शकतात. यावल वन विभागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे गणना केली जाते.

या प्राण्यांचे घडणार दर्शन

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाशात निसर्गानुभवासह प्राणी रगणना करीत असताना, प्रामुख्याने बिबट, अस्वल, सांबर, तडस, कोल्हा यांसह चितळ, भेडकी, चौशिंगा, सायाळ, नीलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. विविध प्रकारचे पक्षीही आढळतात. जंगल सफारीदरम्यान वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभवही मिळतो.

यावल वन विभागातील नैसर्गिक पाणवठ्यांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुद्ध पाणीपुरवठा करणे, पाणवठ्याशेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती, तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरू आहेत. प्राणीगणनामध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/8AWnHT2HRDRNJE7CA या संकेतस्थळावर जाऊन पर्यावरण प्रेमींनी रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. निसर्ग अनुभवणाऱ्या व्यक्तींसाठी भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर नियोजन करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT