Collector Ayush Prasad while inspecting the damaged crop.
Collector Ayush Prasad while inspecting the damaged crop. esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal rain Damage : नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal rain Damage : तालुक्यातील तीन मंडळात तब्बल १७ महसुली गावांना वादळी वारा, गारपीट यांचा तडाखा बसला आहे. त्यामुळे उभे पीक जमिनीवर कोसळले असून, नुकसानग्रस्त भागाची पाहणी तत्काळ करून बुधवार (ता. २८) सायंकाळपर्यंत सरसकट पंचनामे करा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

तालुक्यातील पारोळा व बहादरपूर मंडळात झालेल्या गारपीट, पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर ते तहसील कार्यालय झालेल्या बैठकीत बोलत होते. (Jalgaon Collector Ayush Prasad statement Immediately report damage)

या वेळी प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय ढमाळे, शहर तलाठी निशिकांत पाटील यांच्यासह मंडळाधिकारी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की महसूल व कृषी विभागाकडून शंभर टक्के पंचनामे करण्यात येतील, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले नाव, आधार बँक व मोबाईल क्रमांक याची माहिती द्यावी, तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमार्फत काम देण्यात येतील.

नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिली असेल ती देखील पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, या दोन मंडळात गारपीट, वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, भिलाली येथे आठ शेळ्या, मेंढ्या दगावल्या आहेत.

याबाबत योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल, तसेच नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील. (Latest Marathi News)

आमदार चिमणराव पाटील यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे नुकसानग्रस्त भागाची तत्काळ पाहणी करून लवकरात लवकर अहवाल हा वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी तीन महिन्याच्या कालावधीत घेण्यात येणारी छोटी पिके आपल्या शेतात घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच तालुक्यातील वादळी व गारपिटीमुळे पशुधनास इजा झाली असेल अशा जनावरांची योग्य ती तपासणी व औषधोपचार पशुधन विभागाकडून करण्यात येईल, अशा सूचना देखील देणार येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी मोंढाळे प्र. अ. हिवरखेडे, शिरसोदे, बहादरपूर, भिलाली, पारोळा मंडळातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडत न्याय द्यावा, अशी मागणी केली. या वेळी नुकसानग्रस्त गावे मोंढाळे प्र. अ. व हिवरखेडे या दोन गावांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.

दरम्यान, सोमवारी (ता. २६) रात्री आठ ते अकराच्या सुमारास झालेल्या वादळी व गारपीट पावसामुळे पारोळा तालुक्यातील पिके जमीनदोस्त झाली असून, सर्वात जास्त नुकसान पारोळा व बहादरपूर मंडळाचे झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

यामुळे तालुक्यासह या मंडळातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, तसेच तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील इतर भागात झालेली गारपीट व वादळी पाऊस यांची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.

वादळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, भुईमूग, पपई, लिंबू यासह रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाली होती. या वेळी तहसील कार्यालय येथे घेण्यात आलेला बैठकीत (स्व.) शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील,

महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी लावून धरली. या वेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी महसूल विभाग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT