Collector Ayush Prasad speaking in the meeting held on Thursday of various parties in the background of the election. Neighbor Officer.
Collector Ayush Prasad speaking in the meeting held on Thursday of various parties in the background of the election. Neighbor Officer. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : प्रचारावेळी झालेल्या खर्चाची अंतिम यादी; 95 लाखांच्या खर्चाची मुभा, मर्यादेतच करा खर्च

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ९५ लाख रुपयांची खर्चाची मुभा असून, त्यांनी खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाची प्रचार करताना तुमच्या प्रत्येक गोष्टींवर नजर असेल. प्रचार करताना कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला, याची अंतिम यादी तयार होईल. (Jalgaon Collector Prasad statement Final list of expenses incurred during campaign will be made)

त्याप्रमाणे खर्च गृहित धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दर निश्चितीसाठी झाली. तीत ते बोलत होते.

जिल्ह्यात ६६ मॉडेल मतदान केंद्र

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ६६ मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. मॉडेल मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यातील काही मतदान केंद्र महिलांकडून, काही मतदान केंद्र दिव्यांग व तरुण कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येणार आहेत.

४५ हजार वृद्ध घरून करणार मतदान

ज्यांच्या वयाची ८५ वर्षे उलटली आहेत, अशा ४५ हजार वृद्ध मतदारांसाठी घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांच्या घरी मतदान कर्मचारी स्वतः घरी जाऊन पोस्टल मतदान पद्धतीने त्यांचे मतदान नोंदवून घेणार आहेत.

जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मदत करण्यासाठी मदतनीस असणार आहेत. निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नव्याने १८ सहाय्यकारी मतदान केंद्रांना मान्यता दिल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

अर्ज भरताना काळजी घ्या

नामनिर्देशन अर्ज दाखल करताना पक्ष व उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त पक्षांना एक सूचक, तर अमान्यताप्राप्त पक्ष, तसेच अपक्ष उमेदवारांना १० सूचक असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पक्षातर्फे दिला जाणारा एबी फॉर्म हा मूळ स्वाक्षरीचाच असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना अर्ज दाखल करताना भरावी लागणारी अनामत रक्कम २५ हजार रुपये रोकड स्वरूपात भरणे आवश्यक आहे. खुल्या जागेसाठी एससी, एसटी उमेदवारांना मात्र या रक्कमेत ५० टक्के सूट दिली आहे. एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र, त्यासाठी उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान २४ तास अगोदर बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे.

मतदान यंत्रावर असलेल्या मतपत्रिकेवर छापला जाणारा उमेदवाराचा फोटो स्वच्छ व अलीकडच्या तीन महिन्यांच्या आतील असावा, अशा सूचनाही श्री. प्रसाद यांनी या वेळी दिल्या. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर.

महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च )चंद्रकांत वानखेडे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा नोडल अधिकारी राजेंद्र खैरनार, उपलेखा वित्त अधिकारी विनोद चावरिया आदी उपस्थित होते.

पक्षांचे प्रतिनिधीही हजर

रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराचे प्रतिनिधी तुषार राणे, जळगाव लोकसभा उद्धव ठाकरे गटाचे विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अशोक लाडवंजारी, आम आदमी पक्षाचे मिलिंद चौधरी, काँग्रेसचे आत्माराम जाधव, भाजपचे दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे नीलेश पाटील, किरण पाटील, नरेंद्र टोके, बबलू सोनवणे, ॲड. आनंद मुजूमदार, नरेंद्र बोरसे, अमोल कोल्हे, आर. पी. बऱ्हाटे यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT