north maharashtra university esakal
जळगाव

NMU News: सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझमची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात निर्मिती! मंत्रिमंडळाची मान्यता; 25 कोटींचा निधी मंजूर

Latest Jalgaon News : विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर यांनी विद्यापीठात (स्व.) बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पत्र दिले होते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (स्व.) बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम उभारण्यासाठी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: प्रशासकीय मान्यता दिली आहे. (Creation of Center of Excellence in Journalism in NMU)

यासंदर्भात सोमवारी (ता. १४) उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी केला आहे. विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर यांनी विद्यापीठात (स्व.) बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पत्र दिले होते.

त्या अनुषंगाने १४ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सेंटर उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांना तत्वत: प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यात (स्व.) बाळासाहेब ठाकरे सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझम भवनाच्या बांधकामासाठी आठ कोटी, वसतिगृहाच्या बांधकामासाठी सात कोटी, दृकश्राव्य केंद्र उपकरणे खरेदीसाठी पाच कोटी आणि केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी, तसेच आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी पाच कोटी, अशा एकूण २५ कोटींच्या कामांना तत्वत: प्रशासकीय मान्यता दिली आहे. (latest marathi news)

राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सुधीर भटकर यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

"शासनाच्या मान्यतेमुळे विद्यापीठातील पत्रकारिता विभाग अपडेट होण्यास मदत होणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होईल."-प्रा. सुधीर भटकर, संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT