Bribe Crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : ‘कलेक्टोरेट’मधील लाचखोर 2 कर्मचारी निलंबित

Bribe Crime : ‘कलेक्टोरेट’ अर्थात, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यरत दोन लिपिकांना वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (ता.९) पकडले होते.

सकाळ वृत्तसेवा

jalgaon Bribe Crime : ‘कलेक्टोरेट’ अर्थात, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात कार्यरत दोन लिपिकांना वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (ता.९) पकडले होते. त्यांना आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निलंबित केले आहे. जळगाव तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार निवडून आले होते. (Jalgaon Crime 2 bribe taking employees in Collectorate suspended marathi news)

परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याबाबत ग्रामस्थांकडून तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत विभागात कार्यरत महेश रमेशराव वानखेडे, समाधान लोटन पवार या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबत चौकशीसंदर्भात अनुकूल अहवाल तयार करून देण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेतली.

आलेल्या तक्रारीची खात्री झाल्यावर पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींनी नियोजनबद्ध सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार यांनी ३० हजारांपैकी २० हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांच्यावर झडप घातली होती. त्याप्रकरणी जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT