Crime
Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 2 अवैध दारु व्यावसायिक स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अवैध दारु विक्रीसह इतर गुन्हे दाखल असलेल्या दादाराव रामदास जोगी (४४, भागदरा, जामनेर) व भिवा बाबूलाल गायकवाड (४८, मेहुणबारे, ता.चाळीसगाव) या दोघा अट्टल गुन्हेगारांवर जिल्‍हा पोलिस दलातर्फे तयार केलेल्या प्रस्तावाला जिल्‍हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. (Jalgaon Crime 2 Illegal liquor traders located)

भिवा गायकवाड याच्याविरुद्ध अवैध दारु विक्रीसह गावठी दारु तयार करण्याससह सहा तर दादाराव जोगी याच्याविरुद्ध १० गुन्हे दाखल आहे. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. जोगी याला येरवडा तर गायकवाड याला नागपूर कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रमेश घडवजे, शामकांत सोनवणे, युनूस शेख इब्राहिम, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, रफीक शेख काळू, दीपक नरवाडे, गोरख चकोर, जितू परदेशी, सुदर्शन घुले, ईश्वर देशमुख आदींच्या पथकाने केली.

जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दादाराव जोगी याच्याविरुद्ध जामनेर निरीक्षक किरण शिंदे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. दोन्ही संशयितांच्या विरुद्ध अवैध गावठी दारु तयार करणे व विक्री करणे, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत.

पोलिसदालाने प्रस्ताव सादर केल्यावर संशयिताला समक्ष हजर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी देताच संशयिताला येरवडा, ता.पुणे येथील कारागृहासाठी रवाना करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT