Beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पैसे देण्यावरून बाप-लेकाला मारहाण; पोलिसांत तक्रार दिली, म्हणून पुन्हा हल्ला

Crime News : पोलिसांत तक्रार दिली, म्हणून पुन्हा सायंकाळी जखमी तरुणाचे वडील मुकेश पांडे (५०, रा. आयोध्यानगर) यांनाही मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पैसे मागितल्याचा राग आल्याने १० ते १२ जणांनी प्रतीक मुकेश पांडे (वय २६, रा. आयोध्यानगर) याला जबर मारहाण करून त्याचा मोबाईल फोडला. पोलिसांत तक्रार दिली, म्हणून पुन्हा सायंकाळी जखमी तरुणाचे वडील मुकेश पांडे (५०, रा. आयोध्यानगर) यांनाही मारहाण केली. (Jalgaon Crime Father son beaten up on giving money)

पांडे डेअरी चौकात मुकेश पांडे यांच्या हॉटेलमध्ये दुपारी काही तरुण नाश्ता करण्यासाठी आले. नाश्ता केल्यानंतर पैसे न देताच जात असल्याने प्रतीक पांडे यांनी बिल केाण देणार, अशी विचारणा केली. पैसे द्यायचेच नसल्याने टोळक्याने वाद घातला. एकाने ट्रे त्याच्या कानावर मारला, तसेच त्याचा मोबाईल फोडला. नंतर ते तेथून निघून गेले.

मारहाणीचे चित्रीकरण करणाऱ्या मुलीचा मोबाईलही टोळक्याने फोडला. जखमी प्रतिक व त्याचे कुटुंबाने जिल्हापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कच्ची माहिती लिहून घेतली. आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करायला जातो, म्हणुन त्या टोळीने पुन्हा सायंकाळी साडेपाचला हॉटेलमध्ये धिंगाणा घालत मालक मुकेश पांडे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्यावर व डोक्यावर वार केले. (latest marathi news)

हॉटेलचालकावर आठ ते दहा जणांनी दोन वेळेस हल्ला केला. पोलिसांत तक्रार दिली, म्हणून हॉटेलमधील साहित्य, खाद्यपदार्थ रस्त्यावर फेकून परिसरात दहशत माजवली. जिल्‍हापेठ पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती, तर कदाचित संध्याकाळी पुन्हा घटना घडली नसती, असे जखमींचे नातेवाईक आणि रहिवाशांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : दिल्ली येथे २०९ किलो वजन असलेल्या 'सुपर-सुपर ओबेसिटी'च्या रुग्णावर यशस्वी बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT