local crime branch
local crime branch esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मक्याच्या शेतात सव्वा एकरवर गांजा लागवड; स्थानिक गुन्हेशाखेची चोपडा मेलाण्यात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चोपडा तालूक्यात मेलाणे शेत शिवारात सव्वा एकर मक्याच्या शेतात मधोमध गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.१२) छापा मारुन तब्बल ४४ लाख १० हजार रुपये बाजारमुल्याचा ९८० किलो ओल्या गांज्याचे पिक उपटून जप्त केले. (Jalgaon Crime Marijuana planted on a quarter acre in corn field Action of local crime branch)

चोपडा शहरापासून साधारण तीस किलोमिटर आत सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी मेलाणे गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हि कारवाई केली. शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या शेतकऱ्याला अटक करुन अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्‍ हापोलिस अधिक्षक कार्यालयाकडून दिलेल्या माहीतीनुसार, सातपुडा पर्वत रांगेत मेलाणे गावात सव्वा एकर शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती.

प्राप्त माहितीची खात्री करण्यासाठी संदिप मांडोळे, संदिप पाटिल दोघे मेलाणे शिवारात मक्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळून येताच पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात, अप्पर अधीक्षक कविता नेरकर. (latest marathi news)

डीवायएसपी डॉ. कृणाल सोनवणे, यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटिल, आपल्या पथकासह धडकले. मक्याच्या शेतात गांजाची लावड करुन हे पिक साधारण चार ते पाच फुट उंचीचे झाल्याचे आढळून आले.

शिवाराला पोलिसांचा घेराव..

गांजाच्या शेतावर कारवाईसाठी वरिष्ठपोलिस अधीकार्यांसह वनविभागाचे अधिकारी कमल ढेकले, नायब तहसीलदार रविंद्र महाजन, छायाचित्रकार, वजनकाटा असा लवा जमा दाखल झाल्यावर सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फैाजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, संदिप पाटिल, गोरख बागुल,दर्शन ढाकणे.

अशोक पाटिल, बबन पाटिल अशांच्या पथकाने शेताला घेराव घालत गांजा पिकाची कापणी करवुन घेत पंचनामा करुन गांज्याचे पिक जप्त करुन शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT