Crime
Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भुसावळला लाखोंचे एमडी ड्रग्ज जप्त; 3 संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील बाजारपेठ पोलिसांनी वरणगाव रस्त्यावरील मधुबन हॉटेलजवळ अंदाजे एक किलो मेफेड्रोन (एमडी) नामक ड्रग्ज जप्त केले असून, या प्रकरणी तीन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. १९) सायंकाळी साडेचारला केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत पोलिस गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीच्या शोधात आहेत. (Jalgaon Crime MD drugs worth lakhs seized from Bhusawal 3 suspects in custody)

अखेर मंगळवारी (ता. १९) वरणगाव रस्त्यावरील मधुबन हॉटेलजवळ तीन संशयितांकडून अंदाजे एक किलो वजनांचा एमडी पावडर जप्त करण्यात आले. या पावडरची किंमत लाखो रुपये आहे. हे अंमली पदार्थ मानवी जीवनावर परिणाम करणारे असून, ते विक्री करीत साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, महिनाभरापूर्वी जळगावातील शाहूनगरात एमडी ड्रगचे सेवन करणाऱ्यास ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रात गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यात तर पसरले नाहीत ना? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (latest marathi news)

‘एमडी’ ड्रग्जचे रॅकेट?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात या आधी पंचशीलनगरमध्ये एमडी पावडरबाबत कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एमडी पावडर विक्री करणारे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, यातील मुख्य म्होरका भुसावळातील असून, दहा हजार रुपये महिन्यापोटी आठ ते दहा तरूणांना कामाला लावून फोनवरून संबंधिताना घरपोच करीत आहे. एमडी पावडर ही सिंधेटिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने मानवाची उत्तेजकता, एनर्जी, प्लेजर शक्ती निर्माण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT