Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवत लाखाची लूट! चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Crime News : कर्मचाऱ्याच्या लुटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे

सकाळ वृत्तसेवा

एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावर बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या कर्मचाऱ्याची दुचाकी अडवून चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. कर्मचाऱ्याच्या लुटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे. (Jalgaon Crime national highway Looting of lakhs)

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णासमोरील महाजननगराजवळ पद्मालय गॅस एजन्सीचे कार्यालय आहे. एजन्सीचे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र पाटील ४ लाख ९१ हजार रुपये दुपारी एकच्या सुमारास सेंट्रल बँकेत भरण्यासाठी दुचाकीने जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकाजवळ राजेंद्र पाटील आले असता, त्याठिकाणी विनाक्रमांकच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या ताब्यात असलेली पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला.

राजेंद्र पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी पाटील यांना चाकूचा धाक दाखवला. राजेंद्र पाटील व चोरट्यांमध्ये झालेल्या झटापटीत राजेंद्र पाटील यांच्या पिशवीतून पाचशे रुपयांचे दोन बंडल रस्त्यावर पडल्यामुळे चोरट्यांनी एक लाख रुपयांचे पडलेले बंडल घेऊन पोबारा केला. झटापटीत राजेंद्र पाटील यांच्या हाताला जखम झाली आहे. चोरट्यांचा लुटीचा थरार सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (latest marathi news)

राजेंद्र पाटील यांची चोरट्यांशी झटापट होत असताना, राष्ट्रीय महामार्गावरून वाहनाची वाहतूक सुरू असतानाही त्याठिकाणी वाहनचालक थांबले नसल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. राजेंद्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे पिशवीतील तीन लाख ९१ हजार सुरक्षित राहिले. दोन्ही चोरटे ३५ ते ४० वयोगटातील असून, त्यांनी चेहरा रूमालाने बांधला होता.

याबाबत राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत. दरम्यान, दुपारी राष्ट्रीय महामार्गावर एक लाख रुपयांची लूट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Rate: सामान्यांसाठी गुड न्यूज! भारतात कच्च्या तेलाचे दर कोसळले; किती रुपयांनी अन् पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

SRH vs PBKS Live: ८ चेंडूंत ३२ धावांचा पाऊस! अभिषेक शर्माच्या फटकेबाजीने मैदान दणाणले... IPL 2026 Orange Cap च्या शर्यतीत टॉपर

Parli Vaijnath News : डॉक्टरांचा हलगर्जीपणा! २२ तास मृत बाळ ठेवले आईच्या गर्भात; कुटुंबियांची डॉक्टरांविरूद्ध पोलिसात तक्रार

ज्या IAS अधिकाऱ्यासाठी ममतांनी PM मोदींचा आदेश धुडकावला, TMC हरताच दिला राजीनामा

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

SCROLL FOR NEXT