Gautam misar esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : पारोळ्यात मुख्याध्यापकाने घेतली 10 हजारांची लाच! मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात

Latest Crime News : मुख्याध्यापकाला शिपायाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : शहरातील एनईएस हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला शिपायाकडून दहा हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी घडली. (principal took bribe of 10 thousand in Parole)

येथील एनईएस हायस्कूलचा मुख्याध्यापक गौतम बालुप्रसाद मिसर (वय ५३, रा. जगमोहनदासनगर) याच्या भावाची काही दिवसांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती, त्या वेळी तो उपशिक्षक म्हणून कार्यरत होता. नोकरी टिकवायची असेल, तर दहा हजार रुपये आणून द्यावेत, अशी मागणी गौतम मिसर याने केली. शिपायाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ९ फेब्रुवारीला तक्रार दिली.

त्यावरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० व १२ फेब्रुवारीला सापळा रचला. मात्र, मुख्याध्यापक मिसर याने लाचेची रक्कम इतर शिक्षकाकडे देण्यास सांगितल्याने कारवाई स्थगित करण्यात आली. मात्र, लाच मागितल्याप्रकरणी त्याच्यावर पारोळा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest marathi news)

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT