Raja Chauhan esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 27 लाखांच्या डाळींवर डल्ला; फरारी ट्रकचालकाला मध्यप्रदेशातून अटक

Jalgaon Crime : औद्योगीक वसाहत परिसरातील राघाकृष्ण ॲग्रो इंडस्ट्रीजमधून २७ लाख २९ हजार ६७८ रुपयांची डाळ पनवेल येथे पाठविली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : औद्योगीक वसाहत परिसरातील राघाकृष्ण ॲग्रो इंडस्ट्रीजमधून २७ लाख २९ हजार ६७८ रुपयांची डाळ पनवेल येथे पाठविली होती. मात्र, ट्रकचालकाने परस्पर डाळींची विल्हेवाट लावून फारारी झाला होता. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक केली आहे. चैत्रबन कॉलनीतील तिलक रवींद्र कबरा (वय ३१) यांचा औद्योगीक वसाहतीत राधाकृष्ण ॲग्रो इंडस्ट्रीज नावाने डाळ मिल आहे. (stolen on 27 lakh of pomegranate police arrested from madhya pradesh )

मिळालेल्या ऑर्डरीनुसार ३० मेस त्यांच्या डाळ मिलमधून अनिल प्रल्हाद खेडकर (रा. पनवेल, जि. रायगड) यांच्या ट्रकमधून (डीडी ०१, एम ९४६५) काबरा यांच्या मिलमधून २७ लाख २९ हजार ६७८ रुपयांची डाळ भरण्यात आली. पनवेल (जि. रायगड) येथे ती डाळ घेऊन ट्रकचालक राजासिंग ऊर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसराहा, सिधी, मध्यप्रदेश) ३० मेस निघाला.

मात्र, त्याने नियोजीत ठिकाणी डाळ न पोचविता, परस्पर डाळीची विक्री करून फारारी झाला होता. याबाबत तिलक काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ट्रकचालक राजा चौहान मध्य प्रदेशात त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन अव्हाड यांना मिळाली होती.

त्यावरून गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटिल, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंडे यांनी मध्य प्रदेशातील जंगलातून त्याला ४० लाखांच्या ट्रकसह ताब्यात घेतला. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश वसीम देशमुख यांनी ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भिवंडीत विकला माल

पोलिसी खाक्या दाखवताच राजा चौहान याने २७ लाख २९ हजार ६७८ रुपयांची डाळ भिवंडी (जि. ठाणे) येथे मिळेल त्या भावात विक्री केल्याचे सांगितले. त्याच्यावर मध्यप्रदेशात खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याच्या इतर साथीदारांच्या अटकेसह चोरीचा माल जप्तीसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT