Murder esakal
जळगाव

Jalgaon Crime: जामनेरला पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक! बालिका खून प्रकरणी संशयिताच्या अटकेनंतर उद्रेक; 10 ते 12 पोलिस जखमी

Crime News : नाईलाजास्तव जमावाला पांगविण्यासाठी जोमाने लाठीमार सुरू केला आणि मोठा उद्रेक होत असल्याचे पाहून हवेत गोळीबाराच्या सात-आठ फैरी झाडल्या.

सकाळ वृत्तसेवा

जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा येथील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिला ठार केल्याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी गुरुवारी (ता. २०) जेरबंद केल्यानंतर त्या पीडित कुटुंबीयांच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावरच धावा बोलून उद्रेक केला. तुफान दगडफेक करून काचा फोडल्या आणि परिसरातील काही दुचाकींसह अन्य वाहनांना आग लावली. या घटनेत सुमारे दहा ते पंधरा पोलिस कर्मचारीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Jalgaon Crime Stone pelting at Jamner police station)

पोलिस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य पाहून जमावाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावातील लोक शांत बसायला तयार नव्हते. संशयिताला आमच्या ताब्यात द्या, असा घोषणा देऊन दगडफेक सुरूच ठेवली. त्यामुळे पोलिसांनी सुरवातीला सौम्य लाठीमार करून पाहिला. तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे नाईलाजास्तव जमावाला पांगविण्यासाठी जोमाने लाठीमार सुरू केला आणि मोठा उद्रेक होत असल्याचे पाहून हवेत गोळीबाराच्या सात-आठ फैरी झाडल्या. (latest marathi news)

एसपींसह फौजफाटा दाखल

जामनेर शहरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री नऊपासूनच शहरातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने संबंधितांनी फटाफट बंद केली. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी वरिष्ठांना कळविले. त्यावरून अधिकारी शहरात उशिरापर्यंत दाखल झाले आहेत.

शिवाय जास्तीची पोलिस कुमक, दंगानियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री जिल्हा पाेलिस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांच्यासह पोलिस अधिकारी शहरात दाखल झाले असून, नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT