Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बंद घर फोडून चोरट्यांनी लांबवला ऐवज

Jalgaon Crime : चोरट्यांनी ५० हजारांसह सोने-चांदीचे दागिने, असा एकूण एक लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : ध्यान साधना केंद्रात शिबिसाठी गेलेल्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयाच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ५० हजारांसह सोने-चांदीचे दागिने, असा एकूण एक लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १४ जून ते १६ जूनदरम्यान सुनंदिनी पार्कमध्ये घडली. सुनंदिनी पार्क येथील रहिवासी दिनेश भगवान भालेराव (वय ४४) यांची मुलगी इगतपुरी येथे ध्यान साधना केंद्रात शिबिरासाठी गेली होती.

तिला घेण्यासाठी शुक्रवारी (ता. १४ ) दिनेश भालेराव कुटुंबीयांसह गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी कडीकोयंडा व आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी (ता. १६) पहाटे साडेचारला भालेराव कुटुंब जळगावला आले. घरी परतले.

त्या वेळी त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. आत जाऊन पाहिले, तर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे तपास करीत आहेत.

चोरी करतांना दागिना पडला

भालेराव यांच्या घरातून चोरी करून पळून जात असताना, त्याच्या हातून २५ ग्रॅम सोन्याचा दागिना खाली पडला. त्यामुळे तेवढे सोने चोरीपासून वाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live: चुकीला माफी नाही! सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची दादागिरी; पंजाब किंग्सला महागात पडला ढिसाळपणा

Sunetra Pawar: मोठा राजकीय निर्णय! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा; महाराष्ट्रात फुलफोकस एंट्री

विजयला रोखण्यासाठी कट्टर शत्रू एकत्र येणार? तामिळनाडुत राजकीय भूकंपाची शक्यता, DMK अन् AIDMKच्या आघाडीची चर्चा

SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

Crude Oil Rate: सामान्यांसाठी गुड न्यूज! भारतात कच्च्या तेलाचे दर कोसळले; किती रुपयांनी अन् पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

SCROLL FOR NEXT