Pistol
Pistol sakal
जळगाव

पिस्तूल विक्रेत्याला अटक; दोन कट्ट्यांसह मॅक्झिन जप्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील मासुमवाडी परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी बाळगून असलेल्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल जप्त केले आहेत.मासुमवाडी परिसरात गावठी पिस्तूल विक्रेता येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती.

गुन्हे शोध पथकाने साध्यावेशात परिसरात सापळा रचला असता अली ऊर्फ डॉलर शाहरुख शकील अली (वय २९. रा. गेंदालालमील) याला संशयित हालचालींचा अंदाज घेत ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत असताना त्याची अंग झडती घेतल्यावर त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तूल आढळून आले. त्याला अटक करुन पोलिस कर्मचारी चंद्रकांत बळीराम पाटील यांच्या तक्रारीवरून बेकायदा शस्‍त्र बाळगल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. साहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT