ed esakal
जळगाव

Jalgaon Cyber Fraud : ईडीच्या नावे धमकावून 15 लाख लाटले; भुसावळच्या अभियंत्याला ऑनलाईन गंडा

Cyber Fraud : भीती घालून त्यांची १५ लाखांत फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cyber Fraud : भुसावळ येथील ज्येष्ठ अभियंत्याची सायबर भामट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केली. ‘मी टिळकनगर पोलिस ठाण्यातून बोलतोय. तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रार दाखल झाली आहे. तुम्हाला अटक करावी लागेल’, अशी भीती घालून त्यांची १५ लाखांत फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्याच्या मोबाईलवर बुधवारी (ता. २६) सकाळी साडेनऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा फोन आला. (Bhusawal engineer cheated online by threatening 15 lakhs in name of ED)

बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून, तुमचा फोन दोन तासांत बंद होईल, असे सांगण्यात आले. त्याचे कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून, याबाबत मुंबईत तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास त्यांना दुसरा फोन आला. पलीकडील व्यक्तीने टिळकनगर ठाण्याचा पोलिस निरीक्षक विनायक बाबर बोलत असून, तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रार दाखल झाली आहे. तुम्हाला अटक करावी लागेल’, अशी भीती घातली.

त्यांना खरे वाटावे, म्हणून ईडीच्या सही शिक्क्यानिशी पत्र पाठविले. वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासोबत कॉन्फरन्समध्ये घेण्याची बतावणी केली. तुमच्या नावाचे पकड वॉरंट असून, हा प्रकार थांबवायचा असेल, तर तुम्हाला तर रक्कम भरावी लागेल, असा दम भरला. निरीक्षक विनायक बाबर नामक व्यक्तीने त्याचे बंधन बँकेचे खाते क्रमांक पाठविले. नंतर दुपारी साडेबाराला फोन करून सांगितले, की आताच बँकेत जाऊन पैसे भरा. नाही तर तुम्हाला अटक होईल.

त्यानुसार अभियंत्यांनी भीतीपोटी त्यांच्या कॉसमॉस बँकेच्या खात्यातून बंधन बँकेच्या खात्यात १५ लाख रुपये आरटीजीएसमार्फत भरले. घडलेला प्रकार अभियंत्याने आपल्या ओळखीच्या सहकाऱ्यांना सांगितला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मित्र, कुटुंब आणि नातेवाइकांनी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी गुरुवारी (ता. २७) सायबर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण विशेष सत्र न्यायालयाकडे वर्ग

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SCROLL FOR NEXT