Officials of Kisan Morcha of BJP inspecting the damage in the fields. esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain Damage : किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून नुकसानाची पाहणी

Jalgaon : भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात मंगळवारी (ता. २७) झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain Damage : येथील भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात मंगळवारी (ता. २७) झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

तालुक्यातील वरखेडे, लोंढे, विसापूर व दरेगाव या गावात पाहणी करतेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील निकम उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे, असे आश्वासित केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या व तेथूनच प्रांताधिकारी प्रमोद हिले व तहसीलदार प्रशांत पाटील यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीसाठी बोलविले.

त्यानुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांसह मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांनी शेतात येऊन नुकसानाची पाहणी केली.

यावेळी भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र साबळे, जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT