मतदार नोंदणी मोहीम Sakal
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम

जिल्ह्यात ३४ लाख मतदार : युवकांना मतदारयादीत नावनोंदणीची संधी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ नोव्हेंबरला छायाचित्रासह मतदार यादी जाहीर केली आहे. त्यात, जिल्ह्यात ३४ लाख ४१ हजार ४२१ मतदार आहेत. १७ लाख ८८ हजार १९ पुरुष तर १६ लाख ४५ हजार २७० महिला मतदार आहेत. आयोगाच्या सूचनांनुसार मतदारांना आपले नाव, पत्ता, फोटो पाहून त्यातील त्रुटी काढण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचा कालावधी दिला आहे. यात मतदारांना तहसिल कार्यालय, ग्रामपंचायतीत जाऊन मतदार याद्या पाहून आपल्या नावातील चुका काढता येतील. तर नवमतदारांसाठी चार दिवस नवमतदार म्हणून नाव नोंदविण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

पाच जानेवारी २०२२ ला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. ती आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ज्या मतदारांची नावे दुबार असतील त्यांना एकाच ठिकाणी नावे ठेवण्यासाठी अर्ज करावयाचा आहेत. ज्यांच्या नावात, फोटोत दुरुस्त्या आहे, अशांनाही त्या दुरुस्त करता येणार आहे. ज्या राजकीय पक्षांना मतदार याद्यांवर हरकती, दावे दाखल करावयाचे आहेत, त्यांना ते करण्यासाठी मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

मतदारयादी पुनरीक्षण असे होईल

मतदार यादीवर दावे, हरकतीचा कालावधी : १ ते ३० नोव्हेबर

विशेष मोहिमांचा कालावधी : १३, १४, २७, १८ नोव्हेंबर

दावे व हरकती निकालात काढणे : २० डिसेंबर

मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे : ५ जानेवारी २०२२

फॉर्म - नमुना नं. ६ - नव्याने मतदार नोंदणी करणे.

फॉर्म - नमुना नं. ७ - मयत मतदार, स्थलांतरित मतदार

फॉर्म - नमुना नं. ८ - मतदार यादीतील नावांची किंवा तपशिलाची दुरुस्ती

फॉर्म - नमुना नं. ८ अ - मतदार संघामध्ये स्थलांतर झाले असल्यास नाव नोंदणीकरिता

मतदारसंघानुसार मतदार असे

चोपडा ३ लाख १४ हजार ३१८

रावेर २ लाख ९२ हजार ५४२

भुसावळ ३ लाख ५ हजार ८५२

जळगाव शहर ३ लाख ८४ हजार ५६

जळगाव ग्रामीण ३ लाख ९ हजार ८६६

अमळनेर २ लाख ९५ हजार ४५९

एरंडोल २ लाख ७९ हजार ८३८

चाळीसगाव ३ लाख ५४ हजार १७०

पाचोरा ३ लाख ११ हजार ९२४

जामनेर ३ लाख ७ हजार ३८

मुक्ताईनगर २ लाख ८६ हजार ३५८

एकूण ३४ लाख ४१ हजार ४२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT