A ruined banana garden in Shivar. Uprooted lemon tree. esakal
जळगाव

Jalgaon Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाने शेतशिवारात दाणादाण! चोपडा तालुक्यात 2 म्हशी ठार

Pre-Monsoon Rain : जिल्ह्यातील काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Pre-Monsoon Rain : जिल्ह्यातील काही भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. चोपडा तालुक्यातील अनेक गावांत ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा, पाऊस झाल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे कोलमडली. चोपडा तालुक्यातील लासूर येथे वादळी वाऱ्यामुळे झाड पडून म्हैस मृत्युमुखी पडली, तर अनवर्दे बुद्रुक येथे वीज पडून म्हैस ठार झाली, तर हिंगोणे येथील सात ते आठ घरांची पत्रे उडाली. ()

दुसरीकडे पाचोरा तालुक्यात कुरंगीसह गिरणाकाठावरील परिसरात वादळी वाऱ्याने केळीसह लिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्याने मामलदे येथील जिल्हा परिषद शाळेचे देखील पत्रे उडून नुकसान झाले आहे.

अडावद, गोरगावले या भागातील किमान ४० हेक्टर शेतजमिनीवरील केळी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाचे अधीक्षक दीपक साळुंखे यांनी दिली. दरम्यान, सातपुडा भागातील काही आदिवासी गावांत देखील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. (latest marathi news)

कुरंगी परिसराला झोडपले

नांद्रा (ता. पाचोरा) : कुरंगीसह गिरणाकाठावरील परिसरात शुक्रवारी (ता. ७) रात्री नऊपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात केळीबागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्याचबरोबर लिंबाच्या बागांनाही फटाका बसला आहे. मोठमोठी झाडेही उन्मळून पडली आहे.

वीजखाबांवरही झाडे पडल्याने रात्री नऊपासून सकाळी बारापर्यंत पाचोरा येथून येणाऱ्या ३३ केव्हीचा वीजपुरवठा हा माहेजी व लासगाव फिटरमधून खंडित झाला होता. दरम्यान, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला. कुरंगी येथील माजी सरपंच पंढरीनाथ गोविंदा पाटील यांच्या सहा बिघे शेतातील सात हजार केळीखोड जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले.

शेतातील लिंबूबागही जमीनदोस्त झाली आहे. या बाबतीत कुरंगी तलाठी नजीम शेख यांनी शेतात जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. पंचनामे झाल्यावर शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल, असे आमदार किशोर पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Hidkal Reservoir Fort : 50 वर्षांनंतर हिडकल जलाशयातून बाहेर आलं मोठं रहस्य; पाणी आटताच समोर आला थरारक इतिहास, 'या' किल्ल्याची स्थापत्यकला पाहून थक्क व्हाल

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : संजय दिना पाटलांच्या मनात पत्रकारांबाबत कुठलाही राग नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

SCROLL FOR NEXT