Ration shop esakal
जळगाव

Jalgaon News : सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य दुकानदारांसह ग्रामस्थही त्रस्त!

Jalgaon News : याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी दुकानदारांसह लाभार्थी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

वावडे (ता. अमळनेर) : गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अमळनेर शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व रेशनधारक ग्राहक त्रस्त झालेले आहेत. याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी दुकानदारांसह लाभार्थी ग्रामस्थांकडून केली जात आहे. (Due to server down villagers suffering with ration shopkeepers)

अमळनेर तहसील कार्यालयाअंतर्गत ग्राहकांना स्वस्त धान्य सोसायटी व रेशन दुकानांमार्फत सध्या ऑनलाइन पद्धतीने वितरित केला जात आहे. परंतु, मागील चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने दुकानदार व ग्राहकांची गैरसोय होत आहे. ऑनलाइन करण्यासाठी मशीनला ग्राहकांना अंगठा दिल्यानंतर दुकानदारांकडून माल मिळत आहे.

शासनाने तत्काळ सर्व्हरची दुरुस्ती करून ग्राहकांना माल देण्याची मागणी केली आहे. चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. रेशन मालासाठी ग्राहक हे पावसात दुकानात चकरा मारीत आहेत. या तक्रारीमुळे दुकानदार व ग्राहक यांच्यात शाब्दिक चकमकीही होत आहेत. (latest marathi news)

"ई-पॉस मशीन सुरू केल्यानंतर त्यात ग्राहक क्रमांक म्हणजेच आरसी नंबर टाकले जाते. त्यानंतर मशीनमध्ये संबंधित कार्डधारकाला किती धान्य मिळणार, हे स्पष्ट होते. या प्रक्रियेनंतर मशीन रक्कम दाखविते, परंतु सध्या ई-पॉस मशीन ही रक्कम दाखवीत नाही. सात ते आठ वेळा प्रयत्न केल्यानंतर रक्कम दर्शवीत नाही. त्यामुळे धान्य वाटप करणे शक्य नाही."

- युवराज पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, वावडे (ता. अमळनेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT