Summer
Summer esakal
जळगाव

Jalgaon News : उन्हाळ्याची चाहूल.. वातावरणात बदल; सकाळी, रात्री थंडी, अन दिवसा ऊन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि पहाटे व रात्रीच्या वेळी थंडी पडत आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत असून ताप, सर्दी तसेच खोकला तसेच व्हायरल आजार वाढले आहेत. पुढील काही दिवस हवामानातील चढ-उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Jalgaon environment is changing and fever cold and cough as well as viral diseases have increased)

गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात मोठ्या प्रमाणावर फरक असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी पडत असून असे विषम हवामान सध्या अनुभवायला मिळत आहे. विषम हवामानामुळे गेल्या काही दिवसांत साथीचे आजारही बळावले आहेत.

गेल्या २७ ते २९ फेब्रूवारी व १ मार्चला जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात बदल होत आहे. गेल्या काही दिवसांत तापमानातील फरक वाढला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची दाहकता, तर रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आहे. वातावरणातील हा बदलाचा लपंडाव मानवी आरोग्यासाठी त्रासदायक तर पिकांसाठी घातक ठरत आहे.

डिसेंबर व जानेवारी महिन्यात काही दिवस पारा चांगलाच खाली होता. त्यामुळे आठ ते दहा दिवस थंडी जाणवली होती. दिवसा व रात्रीच्या तापमानात सुमारे दहा ते बारा अंशांपर्यंतचा फरक जाणवत आहे. (latest marathi news)

रुग्ण वाढले..

हवामानातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या विषमतेमुळे व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांसोबतच अन्य काही साथीचे रोग बळावले आहेत. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

"वातावरणातील बदलाचा परिणाम आरोग्यावर होत असतो. सकाळी बाहेर पडताना सर्दी होवूनये याासाठी कान, नाक रूमालाने बांधावे. गरम पाणी प्यावे. व्यायाम, योगा, प्राणायाम दररोज करावा. दिवसा उन्ह अधिक असल्याने पाणी अधिक प्यावे." -डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT