A rare flowering vine of 'Kanhopatra'. esakal
जळगाव

Jalgaon News : दुर्मिळ ‘कान्होपात्रा’ वेलीचे वारकरी संप्रदायात महत्त्व; प्रत्येक गाव पंढरी मानून हरितवारीत लागवड

Jalgaon : ‘कान्होपात्रा’ या विठ्ठलभक्त वारकरी संप्रदायाच्या संत होत्या. पंढरपूर येथे त्यांच्या समाधिस्थळी वाघाटी म्हणजेच तरटी वेल उगवली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘कान्होपात्रा’ या विठ्ठलभक्त वारकरी संप्रदायाच्या संत होत्या. पंढरपूर येथे त्यांच्या समाधिस्थळी वाघाटी म्हणजेच तरटी वेल उगवली. या वेलीस ‘कान्होपात्रा’चे झाड म्हणूनच ते पुजले जाते. आधी दर्शन या वेलीचे मग विठ्ठलाचे अशी परंपरा असून, पाचशे वर्षांपासून ती पुजली जात आहे. मात्र पंढरपूर येथे ती महावेल आता सुकली असून, प्रत्येक गाव पंढरी मानून हरितवारी या उपक्रमातून तिचे रोपण होत आहे. (Every village of Kanhopatra plant is considered to be Pandhari and planted in Hari)

वाघाटीच्या फळांना गोविंदफळ म्हणतात व ती विठ्ठलास प्रिय असून, द्वादशीला उपवास सोडताना विठ्ठलास नैवेद्य दाखवितात. हा वृक्ष वारसा असाच शतका नुशतके महाराष्ट्राच्या मातीत असावा व दुर्मिळ प्रजातीचे संवर्धन व्हावे म्हणून सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व दुर्मिळ प्रजाती वाचविणारे डॉ. संतोष पाटील यांनी ही वाघाटीची रोप निर्माण करून ती राज्यातील मंदिर परिसरात लावली असून, नुकतीच तोंडापूर येथील प्रसिद्ध अंबा भवानी मंदिर प्रांगणात डॉ. संतोष पाटील यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. याच्या संगोपनाचे पालकत्व महंत श्रीराम त्यागी, भूषण कानडजे, राहुल रॉय मुळे यांनी स्वीकारले आहे. (latest marathi news)

''इंडियन वांडेरर सह सात प्रजातींची फुलपाखर यांचा जीवनक्रम या वेलीवर अवलंबून आहे. वाघाटीचे शास्त्रीय नाव ‘कॅपारिस झायलेनिका’ असे असून अनेक पक्षांना हिची फळे प्रिय असून, त्या द्वारे हिचा बीज प्रसार होतो. ही वेल अत्यंत दुर्मिळ झाली आहे. जालना व छत्रपती संभाजीनगर, जळगाव जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळी रोपण केली आहे व ही जैवविविधता संवर्धित करत आहे.''- डॉ.संतोष पाटील,पर्यावरण संवर्धक, अभिनव प्रतिष्ठान,सिल्लोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT