Death esakal
जळगाव

Jalgaon News : धावत्या रेल्वेखाली झोकून देत प्रेमीयुगलानं उचललं टोकाचं पाऊल; प्रेयसीचा मृत्यू, तर प्रेमी देतोय मृत्यूशी झुंज

Jalgaon News : या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून, मुलाचे पाय कापल्या गेल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : बोढरे (ता. चाळीसगाव) येथील प्रेमीयुगलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकाजवळ घडली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून, मुलाचे पाय कापल्या गेल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येथील रेल्वे पोलिसांत नोंद झाली आहे. (Jalgaon extreme step taken by couple)

बोढरे येथील रिक्षाचालक सचिन गणपत चव्हाण (वय २२) याचे गावातील त्याच्याच जवळच्या नात्यातील शीतल रामसिंग चव्हाण (वय १९) हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोन्हींनी लग्नाचा विचारही केला होता. मात्र, ते एकाच नात्यातील असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.

आपले लग्न होणार नसल्याचे त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी (ता. ६) रात्री दोन्हींनी गावातून पलायन केले व चाळीसगाव गाठले. बोढरे येथे रात्री मुलगी घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, मुलगी कुठेही मिळून आली नाही. (latest marathi news)

दरम्यान, घरून पळून गेलेले सचिन व शीतल यांनी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर येऊन रात्री दीडच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. सचिनचा मात्र एकच पाय रेल्वेखाली सापडल्याने तो कापला गेला. रेल्वे निघून गेल्यानंतर सचिनने जखमी अवस्थेत त्याच्या मोबाईलवरून बोढरेत भावाला कळवले.

त्यानंतर त्याच्या नातलगांसह इतरांनी चाळीसगावला धाव घेऊन जखमी सचिनला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या दुसऱ्या पायावर शस्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून नोंद झाली आहे. हवालदार गोपालकृष्ण सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT