Guardian Minister Gulabrao Patil, Collector Ayush Prasad, CEO Ankit while inaugurating 'Mother Milk Bank' in District Hospital.
Guardian Minister Gulabrao Patil, Collector Ayush Prasad, CEO Ankit while inaugurating 'Mother Milk Bank' in District Hospital. esakal
जळगाव

Mother Milk Bank : उत्तर महाराष्ट्रात आईच्या दुधाची पहिली बँक जळगावात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव जिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारलेली ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. (Jalgaon First Mother milk bank in North Maharashtra in Jalgaon)

जळगाव जिल्हा रुग्णालयात आज पालकमंत्र्यांच्या हस्ते 'मदर मिल्क बँक ' कार्यान्वित झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किरण सोनवणे उपस्थित होते.

प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसं दूध येत नाही. काहींना उपचारामुळे शिशूंना दूध पाजता येत नाही. अशावेळी अनेक शिशुंना दुर्दैवाने गाईचे किंवा पावडरचे दूध पाजावे लागते. परंतु शिशुंना आईचेच दूध मिळावे या दृष्टीने ह्यूमन मिल्क बँक जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साकारण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. (latest marathi news)

पालकमंत्री यांनी मदर मिल्क बँक कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक मशिनची पाहणी करून त्याची कार्यपद्धती बालरोग तज्ञ डॉ. शैलजा चव्हाण यांच्याकडून जाणून घेतली.

आईच्या दुधाचे महत्त्व

बाळासाठी आईच्या दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र बाळाच पोट भरेल इतकं दूध आईला येणे हेही तेवढंच महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा आई होणाऱ्या अनेक महिलांना दूध कमी येण्याची समस्या निर्माण होतात. एका अभ्यासानुसार, ७५ महिला प्रसूतीनंतर सुरवातीच्या काही महिन्यातच बाळाला स्तनपान करणे सोडतात.

विशेष म्हणजे आईला दूध कमी आल्यास त्याचे परिणाम बाळाच्या पोषणावर होते. अनेकदा यामुळे बाळाच पोट भरत नाही. तर भूक लागल्याने बाळ चिडचिड करतात, रडत असतात. त्यामुळेच आईच्या दुधाची बाळाला कमतरता भासू नये हे खूप महत्त्वाचं असल्याचे यावेळी बालरोग तज्ञ डॉ. शैलजा चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT