In the first rains in Bodwad, there was water in the markets esakal
जळगाव

Jalgaon News : बोदवडला पहिल्याच पावसात बाजारपेठांमध्ये पाणीच पाणी; अतिक्रमणांमुळे गटारी नामषेश झाल्याने दैना

Jalgaon : शहरात बुधवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गांधी चौक परिसर जलमय झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात बुधवारी (ता. २६) दुपारी तीनच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गांधी चौक परिसर जलमय झाला. व्यावसायिक, व्यापारी तथा रहदारी करणाऱ्या नागरिकांना या परिसरातून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागली. शिवद्वार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ही मुख्य बाजारपेठ असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यावसायिक दुकाने आहेत. (first rain in Bodwad there is water in market )

या दोन्ही बाजूंनी दुकानदारांचे ओटे, पायऱ्यांमुळे दोन्ही बाजूंनी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असून, गटारी नामशेष झाल्या असल्याने भुसावळ रोड, डॉ. आंबेडकर चौकापासून पाणी वाहत गांधी चौकात येते. चौकात जणू तलावाचे पाणी साचले आहे, असे वाटते. या मुळे जुनी भाजीमंडी बाहेर पेठ भागात पाणी साचले जाते. सतत तीन, चार तास जोरदार पाऊस झाल्यास या भागातील दुकान अथवा घरांमध्ये पाणी शिरू शकते, तसेच शहरात स्वामी विवेकानंद नगर, हिदायत नगर या भागात गटारी जुन्या किंवा काही भागात गटारी नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहते. (latest marathi news)

अथवा खोलगट भागात पाण्याचे डाबके मोठ्या प्रमाणात साचतात. या डाबक्यांमुळे डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नगर पंचायत प्रशासनाने बाजारपेठमधील दुकाने सील करण्याचे अस्र वापरून मोठ्या प्रमाणात कर वसुली केली. मात्र सुविधा पुरविण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. या साठी प्रशासनाने लागलीच योग्य पाऊल उचलले पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

याबाबत व्यावसायिक जितेंद्र झांबड यांच्याशी संपर्क केला असता वर्षानुवर्षे पाणी आमच्या दुकानासमोर साचते. या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. समोरील गटार नगर पंचायत प्रशासनाने मोकळी करावी, असे त्यांनी सांगितले. याबाबत गटनेते जफर शेख यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, दोन्ही बाजूंनी गटार आहे, पण ती नामशेष झालेली दिसते. गटारी मोकळ्या केल्यास प्रश्न उपस्थित होणार नाही. तातडीने काम हाती घेऊन हा प्रश्‍न सोडवू, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT