A cheap stall at the railway station during the summer season.
A cheap stall at the railway station during the summer season. esakal
जळगाव

Jalgaon Central Railway News: मध्य रेल्वेकडून अवघ्या 20 रुपयांत भरपेट जेवण! अनारक्षित डब्यांमधील प्रवाशांसाठी सुविधा

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : मध्य रेल्वे ‘केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आईआरसीटीसी) सहकार्याने प्रवाशांना विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात म्हणजे अवघ्या २० रुपयांत भरपेट जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Jalgaon Full meal from Central Railway for just 20 rupees news)

उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किफायदशीर दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना केवळ २० रुपयांत जेवण समाधानकारक आणि किफायतशीर किमतीत देण्यात येणार आहे.

तसेच न्याहारीचे जेवण ज्यांना हलका नाश्ता हवा आहे, त्यांच्यासाठी ५० रुपयांत न्याहारी जेवण देखील उपलब्ध आहे. सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हे जेवण आणि पाणी प्लॅटफॉर्मवरील अनारक्षित डब्यांच्या (सामान्य श्रेणीचे डबे) जवळ असलेल्या काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या काउंटरवरून प्रवासी त्यांचा नाश्ता थेट खरेदी करू शकतात. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्टेशनच्या बाहेर जाण्याची गरज नाही.  (latest marathi news)

..या स्थानकांवर प्रारंभ

मध्य रेल्वेच्या इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर, शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर सुरवातीला हे फूड काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टप्प्या टप्प्याने यात वाढ होणार आहे.

उपक्रमाला प्रतिसाद

गेल्या वर्षी सुमारे ५१ स्थानकांवर या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर, रेल्वेने कार्यक्रमाचा लक्षणीय विस्तार केला आहे. आता शंभराहून अधिक स्थानकांवर आणि एकूण १५० काउंटरवर कार्यरत आहेत. भविष्यात आणखी स्थानकांचा समावेश करून या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT