Jalgaon Ganpatinagar Vehicles fire in parking of apartment sakal
जळगाव

जळगाव : अपार्टमेंटच्या पार्किंगमधील वाहने पेटविली

आदर्श, गणपतीनगरातील प्रकार; माथेफिरूचा उच्छाद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदर्शनगर, गणपतीनगर भागात अज्ञात माथेफिरूने शुक्रवारी पहाटे काही वाहनांना पेटवून दिल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, काही अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये घुसून अज्ञातांनी हे कृत्य केल्यामुळे या भागातील सोसायट्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिसांना सूचना देऊनही पोलिसांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

असा घडला प्रकार

शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारदरम्यान आदर्शनगर भागातील सृष्टी अपार्टमेंट व पंजाबी यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये असलेल्या तीन दुचाकी व एक चारचाकी अज्ञात माथेफिरूने पेटवून दिली. या आगीत वाहने खाक झाली आहेत. घटना घडल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले.

कुटुंब अडकले घरात

पंजाबी यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये उभी वाहने जळत असताना, पंजाबी कुटुंब घरात अडकून पडले होते. धुराच्या लोटामुळे त्यांना घराबाहेर पडणे शक्य होत नव्हते. अखेरीस आगीची तीव्रता कमी झाल्यानंतर कुटंबातील सदस्य बाहेर पडले.

अशा प्रकाराची पुनरावृत्ती

या भागात यापूर्वीही पेट्रोल चोरी, तसेच वाहनांनाचे पार्ट चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहाटेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पंजाबी कुटुंब पोलिस ठाण्यात जाऊन आले. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

आणखी एक प्रकार

आदर्शनगरातील डी- मार्टच्या मागील बाजूस असलेल्या आराध्या अपार्टमेंटमध्येही शुक्रवारी वाहने पेटविण्याचा प्रकार पहाटे घडला आहे. या दोन्ही घटनांबद्दल अद्याप पोलिसांत नोंद नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Killing Case : ‘तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस,’ लाथा बुक्यांनी मारताना आडवायला गेलेल्यालाच भोसकलं; २५ वर्षीय शीतलचा मृत्यू, सांगलीत मोठा तणाव

Latest Marathi News Updates : "तर जन सुरक्षा कायद्याच्या आडून सरकार शेतकऱ्यांना नक्षलवादी ठरवेल" - रोहित आर आर पाटील

मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक; ‘मना’चे श्लोकचा भन्नाट टीझर प्रदर्शित

Mumbai Local Fight: दे दणा दण... कॉलर पकडली, एकमेकांना ठोसे हाणले; मुंबईच्या लोकलमध्ये फ्री स्टाईल राडा Video Viral

Agriculture News : कांदा बाजारात नाफेडचा हस्तक्षेप; फडणवीस यांनी लक्ष घालण्याची छगन भुजबळ यांची मागणी

SCROLL FOR NEXT