Girna river flowing with the first rain. esakal
जळगाव

Jalgaon Monsoon Season : शहरात मध्यरात्रीनंतर पावसाची जोरदार बॅटिंग; गिरणा नदी भरली दुथडी

Monsoon Season : शहरात मध्यरात्री धुव्वाधार पाऊस झाला. सलग तीन ते चार तास पावसाने बॅटिंग केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Monsoon Season : शहरात मध्यरात्री धुव्वाधार पाऊस झाला. सलग तीन ते चार तास पावसाने बॅटिंग केली. यामुळे शहरातील नाल्यांना पूर आला, तर गिरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जोरदार पावसाने शेतकरी सुखावला असला, तरी अद्याप पेरण्यायोग्य पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरी अजून चांगल्या पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. मंगळवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे उन्हाचा चटका बसत होता. (heavy rain in city in middle of night )

एमआयडीसी भागात रात्री पावणेअकराला जोरदार पाऊस झाला, तर शहरात मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सकाळी सातपर्यंत खंडितच होता. जोरदार पावसामुळे शहरातील सखोल भागात पाणी साचून तळे तयार झाले होते. गटारींचे पाणी नाल्यात गेल्याने नालेही भरभरून वाहू लागले होते. जोरदार पावसाने रस्ते स्वच्छ झाले असले, तरी रस्ते नसलेल्या परिसरात चिखल झाला आहे.

यामुळे नागरिकांना कसरत करीत वाहने काढावी लागली. वीज गेल्याने रात्र नागरिकांना अंधारात काढावी लागली. महवितरण कंपनीची यंत्रणा जरासा पाऊस झाला तरी कुचकामी ठरते, ही शोकांतिका आहे. पाऊस सुरू असताना वीजपुरवठा बंद करणे समजू शकतो. मात्र, पाऊस बंद झाल्यानंतरही दोन ते तीन वीजपुरवठा खंडितच राहतो. महावितरण उन्हाळापासून वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयश ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

दुपारी असहाय्य उकाडा

शहरात सकाळी दहापर्यंत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र अचानक उन्हाचा तडाखा वाढून असहाय्य उकाडा होत होता. कार्यालय, घरात पंखा लावूनही चिकट घाम येत होता. पाऊस पडल्यानंतर वातावरणात गारवा पाहिजे. मात्र, उष्णता जाणवत होती. (latest marathi news)

शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासात झालेला पाऊस

तालुका--मिलिमीटर

जळगाव--२८.१

भुसावळ--२.२

यावल--१२.८

रावेर--१.२

मुक्ताईनगर--९.७

अमळनेर--२.६

चोपडा--४.२

एरंडोल--५३.५

पारोळा--५.७

चाळीसगाव--८.३

जामनेर--३७.९

पाचोरा--५०.८

भडगाव--२४

धरणगाव--१४.५

बोदवड--१२.५

सरासरी--१७.७ मिलिमीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT