Gold
Gold esakal
जळगाव

Gold Rate : सोन्याने गाठला 73 हजारांचा टप्पा; चांदी 84 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सुवर्ण बाजारात सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे. गुढीपाडवा मुहूर्ताच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात तोळ्यामागे ८०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ झाली आहे. कालच्या व आजच्या दराचा विचार करता सोन्याच्या दरात ८०० रुपयांची तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली आहे. परिणामतः यंदाच्या गुढीपाडव्याला सोन्याच्या विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. (Jalgaon Gold rate has reached level of 73 thousand Silver at 84 thousand)

आज (ता.८) सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ७३ हजार ५४२ रुपये प्रतीतोळा तर चांदी ८४ हजार ४६० पोचली आहे. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सोने खरेदी ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यंदा मात्र सोन्याने ७३ हजारांचा टप्पा गाठल्याने या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या दरवाढीला ग्राहक कसा प्रतिसाद देतात, उद्या कसा प्रतिसाद देतील याकडे सुवर्णबाजाराचे लक्ष लागून आहे.

२९ मार्चला सोन्याचा दरात वाढ होऊन सोने ७० हजारांवर गेले होते. सोन्याने प्रती तोळा (दहा ग्रॅम) ‘जीएसटी’सह ७० हजारांचा टप्पा पार केला होता. सुवर्ण बाजारातील या उच्चांकांमुळे सर्वजण चक्रातून गेले आहेत. एकीकडे लग्न सराई, दुसरीकडे आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने आगामी काळात सोन्याचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होणार आहे.

पाच ते २९ मार्च या कालावधीतील सोन्याच्या बाजाराचे चित्र पाहता पंचवीस दिवसांत सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे. एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोने, चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने, चांदी खरेदीकडे वळले आहेत. लग्नसराई, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमुळे वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदीचा दर ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलो इतका होता. (latest marathi news)

२ एप्रिलला सोन्याचा दर ‘विना जीएसटी’ ६८ हजार ७०० तर चांदीचा दर ७७ हजारांवर होता. त्यात सोन्याच्या दरात ७०० ची वाढ होऊन सोने विना जीएसटीसह ६९ हजार ४०० वर गेले आहे. चांदी काल ७७ हजारांवर होती त्यात एक हजारांची वाढ होऊन ती ७८ हजारांवर पोचली आहे. ३ एप्रिलला ‘जीएसटी’ सह सोने प्रती तोळा ७१ हजार ४८२, चांदी प्रती किलो ८० हजार ३४० वर पोचली आहे. आज (ता.८) सोने ७१ हजार ४०० प्रती तोळा तर चांदी ८४ हजार ४६० प्रती किलो (‘जीएसटी’सह) पोचली आहे.

सोन्याचे काही दिवसांतील दर (विना जीएसटी)

तारीख--सोने (प्रती तोळा)--चांदी (प्रती किलो)

५ मार्च-- ६४ हजार ३००- ७३ हजार

२३ मार्च--६६ हजार २००--७५ हजार

२८ मार्च -६६ हजार ३००--७५ हजार

२९ मार्च--६८ हजार २००--७६ हजार

२ एप्रिल--२०२४- ६८ हजार ७००--७७ हजार

३ एप्रिल --६९ हजार ४००--७८ हजार

५ एप्रिल- ७० हजार ६००--८१ हजार

८ एप्रिल -७१ हजार ४००--८२ हजार

"महिन्याभरातील दरवाढीचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरील खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र सोने खरेदी होईल. तिचे प्रमाण कसे असेल हे उद्या सांगता येईल. नवनवीन दागिने येतात. त्याला ग्राहकांची पसंती असते. - मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी,रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT